महाराष्ट्र मुंबई विधानसभा निवडणूक 2019

आदित्य ठाकरे रात्री उशिरा आमदारांच्या भेटीला!

मुंबई | शिवसेनेचे वरळी मतदारसंघातील आमदार आदित्य ठाकरे यांनी शनिवारी रात्री उशिरा मालाडच्या हॉटेल ‘द रिट्रीट’मध्ये शिवसेना आमदारांची भेट घेतली आहे. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनीदेखील आमदारांसोबत हॉटेलमध्येच मुक्काम केला.

राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाजपला सत्तास्थापनेसाठी विचारणा केल्यानंतर  मुंबईत राजकीय हालचालींना वेग आला आहे.

फुटू नये यासाठी शिवसेनेकडून आवश्यक ती सर्व काळजी घेतली जात आहे. शिवसेनेने त्यांच्या सर्व आमदारांना मालाडच्या हॉटेल ‘द रिट्रीट’मध्ये थांबवलं आहे. आदित्य ठाकरे हे शनिवारी रात्री साडे 12 वाजताच्या सुमारास मातोश्रीवरुन रवाना झाले.

दरम्यान, आमदारांशी चर्चा केल्यानंतर आदित्य ठाकरेही याच हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. आदित्य ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेल ‘द रिट्रीट’मध्ये सुरक्षा आणखी वाढवण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या