बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आम्ही निवडणुकीचा फारसा विचार करत नाही, सरकारने जी वचनं दिली पुर्ण करून दाखवणारच”

मुंबई | महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेने जी वचनं दिली आहेत ते आम्ही पूर्ण करुन दाखवणार. निवडणुकीचा तेवढा आम्ही विचार करत नाही, असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. आदित्य ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली एमएमआरडीए मुख्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

महाराष्ट्रात प्रत्येक अडीच ते पाच वर्षात विविध पातळीवर निवडणूक होत असतात. त्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक लक्षात ठेवून महापालिकेचं बजेट सादर होणार नाही. मुंबईच्या विकासाच्या दृष्टीने बजेट सादर होणार आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

केंद्राच्या बजेटवर लोकांच्या प्रतिक्रिया प्रसारमाध्यांसमोर पाहिल्या. निवडणुका नाहीत त्या राज्यांमध्ये जास्त तरतूद करण्यात आली नाही. निवडणुका लक्षात घेऊन काही राज्यांमध्ये जास्त तरतूद करण्यात आली असल्याचं म्हणत आदित्य ठाकरेंनी केंद्रावर निशाणा साधला.

दरम्यान, केंद्राने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर विरोधकांनी टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनीही यावरून भाजपवर निशाणा साधला होता.

थोडक्यात बातम्या-

लेडी सब इन्स्पेक्टरकडून मानवतेचं दर्शन; एकत्र मृतदेह खांद्यावर घेऊन दोन किलोमीटर प्रवास केला; पाहा व्हिडीओ

“किती दिवस भाजपच्या पाठीवर बसून जायचं?, आपला पक्षही राष्ट्रीय पक्ष आह

मनसेला धक्का! मनसेच्या या बड्या नेत्याने केला भाजपमध्ये प्रवेश

“जुने गेले तर नवे कार्यकर्ते उभारी घेतील, सगळ्यांनाच राज ठाकरे होता येत नाही”

“ठाकरे ‘संपत्ती’ लपवण्यात तर धनंजय मुंडे ‘संतती’ लपविण्यात व्यस्त”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More