शिक्षणमंत्री विनोद तावडेंचा राजीनामा घ्या, आदित्य ठाकरेंची मागणी

मुंबई | मुंबई विद्यापीठातील अनागोंदी कारभाराला कुलगुरुंसोबतच शिक्षणमंत्री विनोद तावडे जबाबदार आहेत. त्यामुळे या दोघांचेही राजीनामे घ्या, अशी मागणी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलीय.

राज्यपाल सी विद्यासागर राव यांची त्यांनी आज भेट घेतली. तसेच आपल्या मागणीचं पत्रही त्यांना दिलं.

मुंबई विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांचा निकाल अद्याप लागलेला नाही, त्यामुळे मुंबईतील महाविद्यालयांना ४ दिवस सुट्टी देण्यात आलीय. हा निर्णय दुर्देवी असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या