अखेर शिवसेनेचा सत्तेतून बाहेर पडण्याचा मुहूर्त ठरला?

अहमदनगर | …अन्यथा सत्तेतून बाहेर पडू, सरकारला असा इशारा वारंवार देण्याऱ्या शिवसेनेचा अखेर सत्तेतून बाहेर पडण्याचा मुहूर्त ठरल्याचं कळतंय. आदित्य ठाकरे यांनी अहमदनगरमध्ये यासंदर्भात भाष्य केलंय. 

समाजातील कोणताही घटक सरकारच्या कामगिरीवर समाधानी नाही. आम्ही तर सत्तेत पहारेकऱ्याच्या भूमिकेत आहोत, त्यामुळे यावर्षी सत्तेला लाथ मारु, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. 

 याचवर्षी सत्तेला लाथ मारण्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं असलं तरी अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार असल्याचं साांगायलाही ते विसरले नाहीत.