सिंधुदुर्ग | एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde) हे मुख्यमंत्री होण्यापूर्वी शिवसेनेचे(Shivsena)काही आमदार घेऊन गुवाहटीला गेले आणि भाजपसोबत (BJP)सरकार स्थापन केले. राज्यात सत्तापालट झाल्यापासून शिवसेनेचे फुटीर नेते आणि शिवसेनेत सतत टोलेबाजी सुरू असते. त्यातच आता कुडाळ येथे आदित्य ठाकरेंनी शिवसंवाद यात्रेदरम्यान बोलताना शिंदे गटाला चांगलंच सुनावलं.
चाळीस ते चाळीस जागांवर निवडणुका होऊ द्या मग बघूयात सत्ता जिंकतेय की सत्य, असं आव्हान आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांनी शिंदे गटाला दिलं आहे. प्रश्न विचारतोय त्याचा आवाज बंद केला गेला जातोय. म्हणजे त्यांचे धंदे करायला ते मोकळे. आम्ही बंडखोरांना काही कमी पडू दिले नाही. प्रेम दिलं, विश्वास दिला. मतदारांनी त्यांना डोक्यावर घेतलं, त्यांच्यावर राजकीय आणि वैयक्तिक उपकार केले. तरीही तुमच्या मनात आमच्याबद्दल राग का? उद्धव ठाकरेंना धोका का दिला?, वार करायचा तर छातीत करायचा पाठीत का केला?, असा सवाल आदित्य ठाकरेंनी यावेळी शिंदे गटाला केला.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या काय चाललंय काही कळत नाही. सध्या दोन लोकांचं जम्बो मंत्रिमंडळ आहे. पण विकास कामे रखडली आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. याकडे दुर्लक्ष करू नका. तसेच सध्या घाणेरड्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे. ज्यांनी बळ दिलं त्याच्याच पाठीत खंजीर खुपसला जातोय. असं घाणेरडं राजकारण याआधी कधीही महाराष्ट्रात झालं नाही, अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी केली आहे.
ज्यावेळी घरातील माणूस आजारी होतो, तेव्हा फुटीर नेते पक्ष फोडण्याचे काम करत होते. ते घरातील लोकांचे नाही होऊ शकले, ते तुमचे काय होणार ?, शिवसेना नावावर चालते. पैसा येतो, जातो. पुन्हा येतो. हे ब्रीदवाक्य आमच्या पणजोबांनी बाळासाहेबांना दिलं, ते पुढे न्यायचं असेल तर तुमची साथ आणि आशिर्वाद हवे आहेत, असंही आदित्य ठाकरे कोकणात जनतेशी संवाद साधताना म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
शिवसेनेबाबत जे.पी. नड्डांचं मोठं वक्तव्य, राजकीय वर्तुळात खळबळ
संजय राऊतांच्या अटकेवर शरद पवारांनी प्रतिक्रिया देणं टाळलं!
राऊतांच्या घरी सापडलेल्या 10 लाखांच्या पाकिटावर एकनाथ शिंदेंचं नाव, शिंदे म्हणतात…
संजय राऊतांच्या घरातून ‘इतक्या’ लाखांची रोकड जप्त
सर्वात मोठी बातमी! संजय राऊतांना ईडीने ताब्यात घेतलं
Comments are closed.