मुंबई | शिवसेना नेते आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी शिवसेनेला लागलेल्या गळतीच्या पार्श्वभूमीवर शिवसंवाद यात्रेचे आयोजन केलं आहे. आज ते मनमाड येथे कार्यर्त्यांशी संवाद साधण्यासाठी जाणार आहेत. त्याचवेळी शिवसेनेचे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील बंडखोर नेते सुहास कांदे (Suhas Kande) यांनी त्यांच्यावर टीका करत आरोप केले आहेत.
आदित्य ठाकरेंनी नांदगाव मतदार संघात येऊन त्यांच्या पर्यटन खात्याचा एक प्रकल्प दाखवावा, असं आवाहन त्यांनी आदित्य ठाकरेंना केलं. आमदार सुहास कांदे हे पाच हजार कार्यकर्त्यांसोबत आदित्य ठाकरे यांची भेट घेणार असल्याची देखील चर्चा आहे. मी हिंदुत्वासाठी लढलो, ही आमची चूक झाली का?, आम्ही शिवसेना सोडली नाही. कोणत्याच पक्षात गेलो नाही. त्यामुळे तुम्ही आम्हाला गद्दार कसे काय म्हणता?, असा प्रश्न कांदे यांनी विचारला.
त्यावर आदित्य ठाकरेंनी आता प्रतिक्रिया दिली आहे. शिवसैनिकांच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी मी कटीबद्ध आहे. गद्दारांची प्रश्न विचारण्याची लायकी नसते, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी सुहास कांदे यांचं नाव न घेता टोला लगावला आहे. आम्ही दिलेली वचने पूर्ण केली आहेत. यापुढेही करत राहू. पाठीत खंजीर खुपसला हे राजकारण मला अजूनही समजलं नाही, असं यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले.
यापूर्वी मी मनमाडमध्ये आलो होतो. आमचं सरकार आलं तर या भागाचा पाणी प्रश्न सोडवू, असं आम्ही आश्वासन दिलं होतं. त्याची आठवण ठेवत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना या योजनेसाठी त्यांनी 300 कोटी रुपये मंजूर करुन दिले. त्यांच्या टीकांना मी उत्तरं देत बसणार नाही, गद्दार नसते तर एकवेळ मी त्यांना उत्तरं दिली असती. गद्दारांची प्रश्न विचारण्याची लायकी नसते, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
थोडक्यात बातम्या –
शिंदे सरकारचा गणेश मंडळांना दिलासा, परवानगी मिळवण्यासाठी ‘ही’ आहे सोपी प्रक्रिया
‘सोनिया गांधी, राहुल गांधी असोत किंवा संजय राऊत…’; ईडी चौकशीवरून राऊतांचं मोठं वक्तव्य
“… त्या बरोबर म्हणाल्या, आदित्य ठाकरे हा महाराष्ट्राचा पप्पूू आहे”
काय सांगता! दात घासतानाही लठ्ठपणा कमी करता येणार?, वाचा सविस्तर
दौपदी मुर्मूंवरील ‘त्या’ टीकेमुळे भारती पवार संतापल्या, म्हणाल्या…
Comments are closed.