बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘अशीच चमकत रहा, तू अशा लोकांपैकी एक…, पाहा आदित्य ठाकरेंनी दिशाला काय दिलाय रिप्लाय!

मुंबई |  13 जूनला शिवसेना नेते आणि पर्यावरण तथा पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस त्यांनी अतिशय साध्या पद्धतीने साजरा केला. त्यांच्यावर वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव झाला. आदित्य यांची खास मैत्रीण अभिनेत्री दिशा पटानीने देखील त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावर आदित्य ठाकरेंनी काल दिशाला रिप्लाय केला आहे.

धन्यवाद दिशा. तू त्या ठराविक लोकांपैकी आहेस ज्यांना मी 13 जून रोजी वाढदिवसानिमित्त ‘तुलासुद्धा शुभेच्छा’ म्हणजे ‘सेम टू यू’ असं म्हणू शकतो. अशीच चमकत राहा आणि प्रगती कर’, म्हणत आदित्य ठाकरेंनी तिला शुभेच्छा दिल्या. तसंच तिने दिलेल्या शुभेच्छांचा देखील स्विकार केला.

आदित्य ठाकरे यांच्यासोबत एकदा डिनरला गेल्यापासून तिच्या आणि आदित्य ठाकरे यांच्या नात्याविषयी बरीच चर्चा सुरू आहे. अनेकदा आदित्य यांना दिशाविषयी विचारलं गेलं आहे पण आदित्य यांनी आणखीही उघड-उघड त्यांच्या नात्याविषयी सांगितलेलं नाहीये.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी आपला वाढदिवस अतिषय साधेपणाने केला. तसंच त्यांनी वाढदिवशीदिनी सामाजिक बांधिलकी जपत एका नवजात बालकाला शस्त्रक्रियेसाठी 1 लाख रूपयांची मदत देखील केली.

ट्रेंडिंग बातम्या-

राजेश टोपेंकडून महाराष्ट्राला मोठी गूड न्यूज… वाचून तुम्हीही सुटकेचा निश्वास सोडाल!

“…तर सलून व्यवसाय सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासन परवानगी देईल”

महत्वाच्या बातम्या-

संजय राऊतांच्या राज ठाकरेंना ‘मनसे’ शुभेच्छा, म्हणाले…

गेल्या 24 तासांत कोरोनाचा धडकी भरवणारा नवा उच्चांक

‘प्रोजेक्ट प्लॅटिना’ मोहिम हाती.. जगातील सर्वांत मोठी ट्रायल महाराष्ट्रात!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More