Top News महाराष्ट्र मुंबई

‘महाराजांचे कार्य संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी’; शिवनेरी किल्ल्यासाठी 23 कोटी मंजूर

मुंबई | अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महारांजांचं जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्याचं संवर्धन, सुशोभिकरण आणि पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी 23 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी माहिती दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित गडकिल्ल्यांचे जतन, संवर्धन आणि त्यांचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेतला आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी गडकिल्ल्याचं जतन, संवर्धन, सुशोभिकरण आणि या परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यात येणार आहे. यासाठी 23 कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. या निधीतून शिवनेरी किल्ल्याचे ऐतिहासिक महत्व जपत त्याचा पर्यटनदृष्ट्या विकास केला जाईल, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

दरम्यान, शिवरायांचं कार्य देश-विदेशातील पर्यटक, अभ्यासकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पर्यटन विभागामार्फत व्यापक कार्य केलं जाणार असल्याचं ठाकरे म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

“चहल मी लक्षात ठेवेल, शेवटी माझ्या लेकानेच मला महापालिका मुख्यालयात आणलं”

“मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा”

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी ठाकरे आहेत हे कर्नाटकच्या सरकारने आता विसरू नये- संजय राऊत

सेक्स करताना अतिउत्साह पडला महागात, तरूणाला गमवावा लागला आपला जीव!

हा घ्या पुरावा! कर्नाटकातल्या सीमा भागांमधील मराठी भाषेचा आणि संस्कृतीचा मुख्यमंत्र्यांनी दिला पुरावा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या