मुंबई | अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील तिसरा अर्थसंकल्प आज सादर केला. या अर्थसंकल्पावरून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर सडकून केली आहे. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
देशातील काही राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत. त्या राज्यांना अर्थसंकल्पात बरंच गिफ्ट मिळालंय. महाराष्ट्र आणि मुंबईला काय मिळालं हे शोधावं लागेल, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे.
सर्वात जास्त रोजगार निर्मिती सध्या पर्यटन क्षेत्रात होऊ शकते. त्यामुळे पर्यटनावर भर देणं अपेक्षित होतं. पण बजेटमध्ये त्यावर काहीच तरतूद केलेली दिसत नाही, अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी केली.
कोरोना काळात कोविडसाठी केंद्र सरकारने 20 लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं. त्या पॅकेजचं काय झालं? असा सवाल करतानाच जे बजेट जाहीर झालं ते या राज्यांना कसं मिळणार? हे सरकारनं जाहीर करावं, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
संकटाचं संधीमध्ये रुपांतर कसं करतात हे दाखवणारा अर्थसंकल्प आहे- देवेंद्र फडणवीस
अर्थसंकल्पानं देशातील जनतेला मरणाच्या वाटेवर नेऊन ठेवलंय- अजित पवार
बजेटमध्ये आत्मनिर्भर भारतचं दर्शन, हा बजेट एक सकारात्मक बदल घडवेल- नरेंद्र मोदी
आत्मनिर्भर भारत म्हणून सादर केलेला अर्थसंकल्प प्रत्यक्षात…- अमोल कोल्हे
‘…असा विचार करणं कितपत योग्य आहे?’; रोहित पवारांची केंद्र सरकारवर टीका