महाराष्ट्र मुंबई

आदित्य ठाकरेंनी उडवली मनसेची खिल्ली, म्हणाले…

मुंबई | पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी मनसेची खिल्ली उडवली आहे. मनसेचा टाईमपास टोळी, असा उल्लेख आदित्य ठाकरेंनी केला आहे.

आदित्य ठाकरे यांनी चेंबूरमधील भक्ती पार्क परिसरात मियावाकी बागेची पाहणी केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध विषयांवर भाष्य केलं.

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसेनेचा वीरप्पन टोळी असा उल्लेख केला होता. याला आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर देत मनसेवर सडकून टीका केली आहे.

ती संघटना आहे की पक्ष आहे मला कळत नाही. त्यांचे कार्यकर्तेही त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. मग आपण का द्यावं? ही तर टाईमपास टोळी आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले होते.

थोडक्यात बातम्या-

ठाकरे सरकारने पंकजा मुंडेंचं ‘ते’ धोरण ठेवलं कायम

“अमिबालाही लाज वाटेल अशी शिवसेना दिशाहीन झाली आहे”

‘राकेश टिकैत हे 2000 रुपयांसाठी कुठेही जायला तयार’; भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

“…तुम्ही पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करुन दाखवा, उगाच मोर्चे काढण्याची नौटंकी करु नका”

“बारामती अ‍ॅग्रोमधील कॉन्ट्रॅक्ट फार्मींग बंद करा मग गाझीपूरला जावा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या