महाराष्ट्र मुंबई

ईडीची कारवाई राजकीय हेतूने, आम्ही कुणालाही घाबरत नाही- आदित्य ठाकरे

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीकडून नोटीस आली आहे. यावर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ईडीची कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असून महाविकास आघाडी कुणालाही घाबरत नाही, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला आहे. ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.

महाविकास आघाडी घट्ट आणि मजबूत आहे. आम्ही देश आणि महाराष्ट्रासाठी काम करत असून आमचं काम सुरूच ठेवणार, असं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

ईडीची नोटीस राजकीय हेतूने दिली आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. राजकीय आकसापोटी या नोटीसा पाठवल्या जात आहेत. हे सर्व राजकीय आहे, असं आदित्य ठाकरे म्हणालेत.

थोडक्यात बातम्या-

पुणे भाजपचा ‘हा’ बडा नगरसेवक अजित पवारांना भेटला; चर्चांना जोरदार उधाण!

“ईडीची नोटीस येणं स्वस्त झालंय, आजकाल कुणालाही नोटीस बजावल्या जातात”

कालपासून ईडीचं कोणी आलं नाही, माझा माणूस भाजप कार्यालयात पाठवलाय- संजय राऊत

रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बोठेच्या अडचणी वाढल्या!

मूठभर बिल्डरांच्या फायद्याचा प्रस्ताव मागे घ्या- देवेंद्र फडणवीस

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या