बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून मोफत लसीकरणाबाबतचं ते ट्विट डिलीट केलं; आदित्य ठाकरेंनी सांगितलं खरं कारण

मुंबई |  मोफत लसीकरणाबाबत केलेलं ते  ट्विट का डिलीट केलं होतं, याचा खुलासा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी केला आहे. तीन दिवसांपूर्वी मी माझं ट्विट डिलीट केलं होतं. कोणताही संभ्रम किंवा गोंधळ निर्माण होऊ नये म्हणून मी ट्विट डिलीट केलं होतं. आता मंत्रिमंडळाने मोफत लसीकरणाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे ही बातमी शेअर करण्याची हीच योग्य वेळ आहे, असं आदित्य यांनी म्हटलं आहे.

राज्यातील नागरिकांचं मोफत लसीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कोरोनाच्या संकटातून नागरिकांचं संरक्षण व्हावं म्हणून कर्तव्य म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे. लवकरात लवकर ही लसीकरण मोहीम वेगाने पूर्ण करण्यात येईल, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय.

काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरेंनी एक ट्विट केलं होतं. यामध्ये राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आमचं कर्तव्य म्हणून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे, असं आदित्य यांनी म्हटलं होतं. मात्र त्यानंतर हे ट्विट डिलीट करण्यात आलं होतं.

दरम्यान, ट्विट डिलीट केल्यानंतर विरोधकांनी आदित्य यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आदित् हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगणारे तुम्ही आहात, वाटाघाटी आणि टक्केवारीमुळे लोकहितासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी जाहीर केलेला मोफत लसीकरणाचा निर्णय वापस घेऊ नये, हीच अपेक्षा, असा टोला पडळकर यांनी लगावला होता.

थोडक्यात बातम्या- 

‘तो फक्त पोरींचे फोन उचलतो’ म्हणणाऱ्या खडसेंना गिरीश महाजनांचं सडेतोड उत्तर, म्हणाले…

“केंद्र सरकारचा फाजील आत्मविश्वास ऑक्सिजन तुटवड्याला कारणीभूत”

रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचं नातं मोठं; 400 किमी अंतराहून येऊन मुस्लिम मित्राने दिली मुखाग्नी

आठ महिन्यांच्या गर्भवतीची हत्या, अत्यंत धक्कादायक घटनाक्रम आला समोर

#सकारात्मक_बातमी | सुरुवातीला बेड मिळेना, 2 दिवस वाहनातच, आज्जीची अखेर कोरोनावर मात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More