मुंबई | पर्यांवरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा नाईट लाईफ सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
कोरोनानंतर पुन्हा नाईट लाईफ सुरू करणार आहोत. मिशन बिगेन सुरू केल्यानंतर हळूहळू आम्ही सर्व बाबी सुरू केल्या आहेत. ज्यामध्ये अद्याप कोणतीही बाब बंद करण्याची वेळ आली नाही, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
आम्ही एमटीडीसी आणि इतर हॉटेल व्यावसायिक यांच्यासोबत पार्टनरशीप करणार आहोत. आणि त्यातून उत्पन्नाचं साधन निर्माण करणार आहोत, असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं आहे.
मुंबईत विटेज कार म्युझियम सुरू करणार आहोत. वरळीत हे म्युझियम असेल असं सांगत मुंबई विद्यापीठाकडून राजाभाई टॉवरसाठी प्रस्ताव आल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय.
थोडक्यात बातम्या-
“संजय राऊत महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांना कधी भेटले नाहीत”
“जनमताचा नाही ठिकाणा अन् मला मुख्यमंत्री म्हणा…”
“राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे तीन महिन्यांचे वीजबिल माफ करा”
गोरेगावमधील फिल्म स्टुडिओला भीषण आग!
“हिंदू काय रस्त्यावर पडले आहेत का?, सरकारला लाज वाटायला हवी”