बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आदित्य ठाकरेंनी मनसेला पुन्हा डिवचलं, म्हणाले…

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंग्यावरून केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटायला सुरूवात झाली आहे. शिवसेना नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मनसेला भाजपची ‘सी टीम’ म्हणून हिणवल्यानंतर आणखी एकदा टीकास्त्र डागलं आहे.

राज ठाकरे यांच्या ठाण्यातील सभेनंतर शिवसेना (Shivsena) विरूद्ध मनसे (MNS) असं शाब्दिक युद्ध रंगलेलं पाहायला मिळत आहे. त्यात आदित्य ठाकरे यांनी गुरूवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना मनसेवर आणखी एकदा टीका केली आहे. त्यामुळे शिवसेना-मनसे वाद चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या विषयावर मला फार टिप्पणी करायची नाही. पण मनसेने भोंगे लावले तर त्यावरून देशातील वाढत्या महागाईबाबत जनतेला माहिती द्यावी. पेट्रोल-डिझेल, सीएनजी आणि अन्य गोष्टींची दरवाढ कशामुळे झाली, हे मनसेने भोंग्यावरून सांगावं, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला आहे.

दरम्यान, साठ वर्षांपूर्वीचा इतिहास न उगळता गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये काय झालं ते सांगावं, अशी टीका देखील आदित्य ठाकरेंनी केली आहे. आदित्य ठाकरेंच्या या टीकेला मनसे काय प्रत्युत्तर देणार हे बघावं लागेल.

थोडक्यात बातम्या-

“संजय राऊतांनी माफी मागावी अन्यथा…”; भाजपचा राऊतांना थेट इशारा

CISF जवानांनी वाचवले तरूणीचे प्राण, झालं असं की…; पाहा व्हिडीओ

राज ठाकरेंचा सरकारला अल्टीमेटम! गृहमंत्री वळसे पाटलांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

“माफ करा बाबासाहेब… आमची लायकीच नाही”; हेमांगी कवीची पोस्ट चर्चेत

“मी महाराष्ट्राला वचन देतो की…”; सोमय्यांचं ठाकरे सरकारला ओपन चॅलेंज

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More