“कपड्यांचे रंग बदलून कधीही हिंदुत्त्व येत नाही, ते तर…”
मुंबई | मशिदींवरील भोंग्याच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. ‘तुमचे भोंगे काढा अन्यथा आम्ही हनुमान चालिसा लावू’, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.
मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर असताना राज ठाकरेंनी हिंदुत्त्वाचा नारा देत जोरदार कार्यक्रमांना सुरूवात केली आहे. पुणे दौऱ्यादरम्यान राज ठाकरेंनी अंगावर भगवी शाल ओढत मारूतीची महाआरती केली. मात्र, याच मुद्द्यावरून शिवसेना नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) राज ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.
अंगावरचे कपडे बदलून हिंदुत्त्व येत नाही. त्यासाठी हिंदुत्त्व हे रक्तात असावं लागतं, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. तर आमच्या मनात आणि रक्तात हिंदुत्त्व आहे, असंही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
दरम्यान, यापूर्वीही आदित्य ठाकरेंनी मनसे (MNS) आणि राज ठाकरेंवर टीका केली होती. मनसे भाजपची (BJP) ‘सी टीम’ आहे अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली होती. त्यानंतर आता हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंनी टीकास्त्र डागलं आहे.
थोडक्यात बातम्या-
‘… तर आमचेही हात बांधलेले नाहीत’, राज ठाकरेंचा थेट इशारा
“अरं…मला बी तमाशाला बोलवा”, अजितदादांच्या वक्तव्याने एकच हशा पिकला
…अन् हलगीच्या तालावर अमोल कोल्हेंनी धरला ठेका; व्हिडीओ तुफान व्हायरल
“आयत्या बिळात नागोबा”, प्रीतम मुंडेंचा धनंजय मुंडेंना खोचक टोला
“राज ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे बनायचंय म्हणून…”
Comments are closed.