मुंबई | प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूतची केस अद्यापही संपलेली नाही. मंत्री आदित्य ठाकरे सुशांतच्या खुनाच्या आरोपाखाली गजाआज जाणार असल्याचं भाजप नेते नारायण राणे यांनी म्हटलं आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी राणे पिता-पुत्रांवर जोरदार टीका केली होती याच पार्श्वभूमीवर त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
सुशांतची आत्महत्या नाही तर तो खूनच आहे. खूनाचे आरोपी आज ना उद्या गजाआड जातील. त्यात एक मंत्रीही असेल आणि तो यांचा मुलगा असेल, असं म्हणत स्पष्टपणे नारायण राणे यांनी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केला आहे.
पोलिसांचा वापर करुन स्वतःच्या मुलाला वाचवणं म्हणजे सत्तेचा दुरुपयोग आहे. सुशांतच्या केसमध्ये स्वतःहूनच काल तुम्ही आपल्या मुलाला क्लीनचीट देऊन टाकली. मात्र लवकरच कोणी मारलं हे तुम्हाला कळेल, असं राणे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, दिशाच्या मृत्यूचं प्रकरणंही बाहेर येईल. हे काही लपणारं नाही. सीबीआयने या प्रकरणाची केस अद्याप बंद केलेली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी अज्ञानात राहू नये, असंही राणे यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने अजून किती दिवस पोळ्या भाजणार?”
“उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदी राहण्याची लायकी नाही”
‘मुख्यमंत्र्यांच्या भाषणात भाजपची दहशत याचाच आनंद’; भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य
…तर आमचाही तोल जाईल आणि मातोश्रीच्या आतल्या गोष्टी बाहेर काढेन- नारायण राणे
रामदास आठवलेंच्या उपस्थितीत अभिनेत्री पायल घोषचा ‘आरपीआय’मध्ये प्रवेश!
Comments are closed.