“आदित्य ठाकरेंनी सांगितल्यानं पब आणि बार बिनधास्त सुरु”
मुंबई | वरळीच्या कमला मिल कंपाऊंड परिसरात असलेल्या पब मध्ये जाऊन मनसेच्या संतोष धुरी यांनी स्वतः लाईव्ह करून पोलखोल केली आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत पर्यटनमंत्री आणि शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
वरळी हा आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असून तेथं फक्त त्यांचं चालतं, अशी टीका फडणवीसांनी केली. मंत्रीमंडळातील सर्वच मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतात. त्यामुळे आदित्यांच्या सांगण्यावरून पब आणि बार चालू आहे, अशी बोचरी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.
कोरोना फक्त शिवजयंतीसाठीच आहे का? मात्र नाईटलाईफसाठी नाही का? अधिवेशनासाठी कोरोना असतो तर फक्त नाईट लाईफसाठी नसतो, असा खोचक टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला आहे.
दरम्यान, मनसे नेते संतोष धुरी यांनी पब-बार चालू असताना लाईव्ह व्हिडीओ शेअर करत आदित्य ठाकरेंना धारेवर धरल. कोरोना फक्त गरीब आणि सामान्यांना होतो का? श्रीमंतांना होत नाही का? असा प्रश्न धुरी यांनी उपस्थित केला होता. मुख्यमंत्री लाईव्ह येऊन फक्त सर्वसामान्य जनतेला नियम सांगतात आणि त्यांच्या युवराजांच्या मतदारसंघात मात्र सगळे नियम धाब्यावर बसवले जातात म्हणजे याचा अर्थ युवराज त्यांचं ऐकत नाहीत का? असा प्रश्न धुरी यांनी उपस्थित केला आहे.
थोडक्यात बातम्या-
सैन्य भरती परीक्षेचा पेपर फुटला, पोलिसांनी केली ‘ही’ धडक कारवाई
…तर मी थेट राजीनामा दिला असता- सुजय विखे
‘दादांच्या पोटातलं ओठावर आलं’; ‘या’ मुद्दयावरून अजित पवार देवेंद्र फडणवीसांमध्ये जुंपली
आम्ही भिकारी नाही, वाटेल तो संघर्ष करू आणि आमच्या हक्काचं घेऊ- देवेंद्र फडणवीस
धक्कादायक! विधानभवनातील ‘इतके’ जण सापडले कोरोना पाॅझिटिव्ह
Comments are closed.