किरीट सोमय्यांच्या नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई | भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) गेल्या अनेक दिवसांपासून सातत्यानेे महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करताना दिसत आहेत. शिवसेनेतीलही (Shivsena) अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केल्यानंतर शिवसेना नेते व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आता सोमय्यांच्या रडारवर आले आहेत.
किरीट सोमय्यांनी ठाकरे सरकारवर एकूण 26 आरोप केले आहेत. त्यानंतर आता आदित्य ठाकरेंची चौकशी होणार असल्याचा खळबळजनक दावा किरीट सोमय्यांनी केला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी आदित्य ठाकरेंची चौकशी होणार, असा गौप्यस्फोट देखील सोमय्यांनी केला.
उद्धव ठाकरेंचे अनेक पार्टनर जेलमध्ये आहेत. हे मी भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढली त्याचं यश आहे. आता 7 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आदित्य ठाकरेंची चौकशी होणार. त्यांना चौकशीला सामोरे जावे लागेलच, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.
दरम्यान, आमदार प्रताप सरनाईकांची चौकशी सुरू आहे. संजय राऊतांची मालमत्ता जप्त झाली. खासदार भावना गवळींवर कारवाई झाली. श्रीधर पाटणकर यांची प्रॉपर्टी जप्त झाली. रश्मी ठाकरेंच्या 19 बंगल्यांचं इन्वेस्टिगेशन सुरू आहे. अनिल देशमुख, नवाब मलिक जेलमध्ये आहेत, ही मी भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढल्याचं यश आहे, असं सोमय्या म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
“…केवळ राजकारणासाठी वातावरण दूषित करू नये”
“उद्धव ठाकरेंच्या सभेला मैदान कमी पडेल, एवढी गर्दी होईल”
राष्ट्रवादीने पाठीत खंजीर खुपसला म्हणणाऱ्या पटोलेंना अजित पवारांचं खोचक प्रत्युत्तर, म्हणाले…
“शरद पवार मोठ्या मनाचा माणूस, त्यांनी आतापर्यंत पाचवेळा माफी मागितली असती”
“कुत्रा आहे, भुंकतोय, जे पण भुंकतोय ते भुंकू द्या”
Comments are closed.