Aaditya Thackeray | केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी पत्रकार परिषद घेत राज्यातील निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार येत्या 20 नोव्हेंबर 2024 ला महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. दोन दिवसांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
मुंबईतील हायव्होलटेज मतदारसंघ अशी ओळख असलेल्या वरळी मतदारसंघाकडे यंदा सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. सध्या शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे या मतदारसंघाचे आमदार आहेत. पण आता भाजपमधील एका महिला नेत्याने वरळीतून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
वरळीमध्ये रंगणार हायप्रोफाईल सामना
वरळी विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार म्हणून भाजप नेत्या शायना एन सी यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. शायना एन सी या भाजपच्या नेत्या आहेत तसेच व्यावसायाने त्या फॅशन डिझाईनर देखील आहेत. शायना एन सी यांचे वडील नाना चूडासामा हे मुंबई शहराचे माजी शेरीफ होते.
ला आदित्य ठाकरेंविरुद्ध (Aaditya Thackeray) निवडणुकीला उभे राहायचे आहे, अशी इच्छा शनाया एनसी यांनी व्यक्त केली आहे. शनाया एनसी यांच्या या इच्छेवर भाजप नेते काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
मनसेकडून अमित ठाकरेंना उमेदवारी?
वरळी विधानसभा मतदारसंघातून मनसेनेही चाचपणी सुरु केली आहे. मनसेकडून अमित ठाकरे (Aaditya Thackeray) हे वरळीतून विधानसभा लढवणार असल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप याबद्दल कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.
जर भाजपने शनाया एनसी यांना वरळीतून तिकीट दिले तर वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे विरुद्ध शनाया एनसी अशी लढत होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! समीर वानखेडे ‘या’ पक्षाकडून विधानसभा लढवणार?
पुण्यात बड्या व्यावसायिकाच्या घरावर ईडीचा छापा; 85 कोटींची मालमत्ता जप्त
सोन्याची जोरदार आघाडी, 10 ग्रॅमसाठी आता मोजा ‘इतके’ रुपये
SBI ने ग्राहकांना दिलं दिवाळी गिफ्ट! लोन झालं स्वस्त
‘सरन्यायाधीश’ पदाच्या दावेदाराचं नाव समोर! डी. वाय. चंद्रचूड यांनी केली शिफारस