बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कवितेतून मोदींवर निशाणा साधलेल्या कृषीकन्येला आदित्य ठाकरेंनी दिलं ‘हे’ खास गिफ्ट!

धुळे | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016 साली नोटबंदी करण्याची ऐतिहासिक निर्णय घेतला होता. नरेंद्र मोदींच्या ऐतिहासिक निर्णयाची अगदी गल्लीबोळात चर्चा पहायला मिळाली. मोदी सरकारनं नोटाबंदी केल्यानंतर अनेक नागरिकांनी सरकारवर टीका केली होती. त्यावेळी का कृषीकन्येनं कविता सादर करत मोदी सरकारवर निशाणा साधला होता.

धुळ्याची कृषीकन्या प्रियंका जोशीनं कवितेतून पुन्हा एकदा नोटबंदीच्या मुद्द्यावर निशाणा साधला आहे. त्यावेळी केलेल्या भाषणात देखील तिने मोदींवर टीका केली होती. त्यामुळे प्रियंकाला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोठी भेटवस्तू दिली आहे. युवती सेनेच्या पदाधिकाऱ्यांची नावं नुकतीच जाहीर करण्यात आली. यावेळी प्रियांका जोशीला महत्त्वाचं पद देण्यात आलं आहे.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेनं कृषीकन्या प्रियंका जोशीला बुलढाणा अकोला जिल्हा विस्तारकपदी नियुक्त करत मोठी भेट दिली आहे. माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलीवर विश्वास ठेवत सर्वात मोठी जबाबदारी दिली. यासाठी मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची आभारी आहे, असं प्रियंकाने यावेळी म्हटलं आहे.

प्रियंकाची गाजलेली कविता –

अच्छे दिनाने शेतकऱ्यांची कंबरडी मोडली,

आमच्या भाजीपाल्याला भाव ने देता, तुम्ही तुमचीच गाजरं विकली,

तुमचीच सत्ता, तुमचंच सरकार असल्याने, तुम्हाला कुणाचा असणार धाक?

मोदीची तुमच्याही खात्यात आले का हो 15 लाख?

काळा पैसा बाहेर येण्याच्या धुंदीत तुम्ही नोटबंदी केली,

नोटबंदी कसली, ती तर माझ्या बापाची वाटबंदी होती

थोडक्यात बातम्या – 

मुंबईकरांच्या चिंतेत वाढ! कोरोनानंतर ‘या’ दोन साथीचं थैमान

‘…तर नियम पुन्हा कठोर केले जातील’; विजय वडेट्टीवार यांचं सूचक वक्तव्य

तारीख ठरली! ‘या’ तारखेला होणार हिवाळी अधिवेशन

सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूचा चाहतीला बसला मोठा धक्का! कोमात गेली तरुणी अन्…

पंजशीर जिंकल्याचा आनंद लहान मुलांच्या जिवावर बेतला; हवेत केला गोळीबार अन्…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More