महाराष्ट्र मुंबई

औरंगाबादच्या नामांतरासंदर्भात आदित्य ठाकरे यांचं मोठं वक्तव्य

मुंबई | औरंगाबादच्या नामांतरावरुन सध्या राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. तसेच नामांतराच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत सुरु असलेल्या वादावर नक्कीच तोडगा निघेल, असा विश्वास राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

महानगरपालिकेच्या मुख्यालयाला भेट देऊन आदित्य ठाकरे यांनी शहरातील विकास कामाचा आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करत संभाजीनगरच्या दौऱ्यावर जाणार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

औरंगाबाद नामांतरावर बोलण्याचा अधिकार भाजपला नाही. त्यांनी सत्ता असताना काही केलं नाही, असा टोला आदित्य ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे.

पाच वर्षे सत्तेत असताना काही केलं नाही. आता आरडाओरडा करत आहेत. भाजपची ही दुप्पटी भूमिका असल्याची टीकाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

सुशांत सिंग राजपूतच्या कामाची उच्च न्यायालयाने केली प्रशंसा

हरिद्वारमध्ये मोठा रेल्वे अपघात, ट्रायल दरम्यान रेल्वेखाली चिरडून चोघांचा मृत्यू

येत्या 24 तासांत ‘या’ भागात पावसाचा अंदाज!

नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का, 2 बडे नेते शिवसेनेत प्रवेश करणार

राज्यातील नव्या कोरोना स्ट्रेनचे तिन्ही प्रवासी पिंपरी चिंचवडचे- राजेश टोपे

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या