‘मी राजीनामा देतो, तुम्ही…’; आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना चॅलेंज
मुंबई | शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिलं आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना मी चॅलेंज दिलेलं आहे. मी वरळीतून राजीनामा देतो. हिंमत असेल तर तुम्ही माझ्या विरोधात वरळीत उभं राहा, असं आदित्य ठाकरे म्हणालेत.
मी राजीनामा देतो. तुम्हीही राजीनामा देऊन मैदानात या. जी काही यंत्रणा लावायची ती लावा. जी ताकद लावायची ती लावा. जेवढे खोके लावायचे ते लावा पण एक सुद्धा मत विकलं जाणार नाही, असं आदित्य ठाकरे म्हणालेत.
शिवसैनिक विकला जाणार नाही, असं सांगतानाच वरळीतून उभं राहा. तुम्हाला पाडणारच, असं आव्हानच आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं आहे.
40 आमदारांनी गद्दारी केली. तुम्हाला आव्हान आहे आमदारकीचा राजीनामा द्या. गद्दार खासदारांना आव्हान आहे. तुम्हीही खासदारकीचा राजीनामा द्या. निवडून येताच कसे ते पाहतो, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
Comments are closed.