बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गोपीचंद पडळकरांनी आदित्य ठाकरेंना डिवचलं, म्हणाले…

मुंबई | ठाकरे सरकारमधील मंत्र्यांमध्येच मोफत लसीकरणाबाबत एकमत नसल्याचं दिसत आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी लसीकरणाबाबतचं ट्विट डिलीट केल्यानं हा प्रकार समोर आला आहे. आघाडीतील या गोंधळावर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी निशाणा साधला आहे.

बिघाडी सरकारचे लाडके मंत्री आदित्य ठाकरे यांचं ट्विट वाचून आनंद झाला. पण तो काही क्षणातच विरला. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगणारे तुम्ही आहात, ‘वाटाघाटीʼ आणि ‘टक्केवारीमुळेʼ लोकहितासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी जाहीर केलेला मोफत लसीकरणाचा निर्णय वापस घेऊ नये, हीच अपेक्षा, असा टोला पडळकर यांनी लगावला आहे. राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्यातील जनतेला मोफत लसीकरण करण्याचं ट्विट केलं. ते वाचून खूप आनंद झाला. मात्र, काही वेळातच त्यांनी ट्विट डिलीट केलं. महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचा निर्णय त्यांनी मागं घेऊ नये, असंही पडळकर म्हणाले.

आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून मोफत लसीकरणावर भाष्य केलं होतं. राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. आमचं कर्तव्य म्हणून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे, असं आदित्य यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. मात्र त्यानंतर हे ट्विट त्यांनी हटवलं. त्यामुळे विरोधकांनी आदित्य यांच्यावर टीकेचा भडीमार केला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्यातील जनतेचं मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं स्पष्ट केलं होतं. मागच्या कॅबिनेटमध्ये या बाबत चर्चा झाली. यामध्ये एकमत होत राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी होकार दिला होता. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी जाहीर केलं आहे, असही नवाब मलिक यांनी सांगितलं होतं.

 

 

 

थोडक्यात बातम्या

#सकारात्मक बातमी | 105 वर्षीय आजोबा आणि 95 वर्षीय आजीची कोरोनावर मात

‘अँड द ऑस्कर गोज टू…’नोमडलँड’; सर्वोत्कृष्ट सिनेमाच्या पुरस्कारावर नाव कोरलं

“महाविकास आघाडी संकटाला संधी मानून राजकारण करत नाही”

‘या’ शहरात कोरोना मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी महापालिकेकडून मिळणार ‘इतक्या’ रुपयांची मदत

18 ते 45 मधील फक्त याच नागरिकांना मिळणार अगोदर लस, अत्यंत महत्त्वाची माहिती

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More