सुशांत आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरेंचा हात?, नितेश राणेंचा दावा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई| बालिवूड(Bollywood) अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा (Sushan Singh Rajput)मृत्यू होऊन जवळपास अडीच वर्षे झाली तरी हे प्रकरण सातत्यानं चर्चेत येत आहे. इतके दिवस झाले परंतु तरीही सुशांतची आत्महत्या होती की हत्या होती, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही.

त्यातच काहि दिवसांपूर्वी मृत्यूनंतर सुशांतला ज्या रूग्णालयात नेण्यात आले होते, त्या रूग्णालयातील कर्मचारी रूपकुमार शाह यांनी या प्रकरणी धक्कदायक खुला केला आहे. सुशांतला जेव्हा पोस्टमार्टनसाठी आणलं होतं तेव्हा त्याच्या अंगावर जखम होती, यावरून त्याची हत्याच झाली आहे, असा दावा शाह यांनी केला आहे.

शाह यांच्या या दाव्यानंतर सुशांत आत्महत्या प्रकरणाला एक नवीन वळण आलं आहे. यानंतर सुशांतच्या वकिलांनीही त्याच्या आत्महत्येमागं मोठं षडयंत्र आहे, अशी प्रतिक्रिया दिली होती.

त्यातच आता भाजप नेते नितेश राणेंनी(Nitesh Rane) सुशांतचा पोस्टमार्टनच्या वेळीचा रूग्णालयातील व्हिडीओ शेअर करत ट्विट करत या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, आता हे स्पष्ट झालं आहे की, सुशांतच्या पोस्टमार्टनवेळी रूपकुमार शाह हे उपस्थित होते.

शेवटी सत्य बाहेर येतेच, बेबी पेंग्विन आता दरवाजा नाही, सुशांतला न्याय मिळेल, असंही ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं आहे. आता राणेंच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर विविध चर्चांणा उधाण आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-