बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आदित्य ठाकरेंचा रावसाहेब दानवेंना टोला, म्हणाले ‘आधीचे रेल्वे मंत्री…’

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रविवारी लोकलसेवेबाबत मोठी घोषणा केली आहे. येत्या स्वातंत्र्यदिनाच्या मुहुर्तावर लोकलसेवा सुरू होणार आहे. यावर केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी यावर प्रतिक्रिया देताना, लोकलमध्ये प्रवास करणाऱ्यांची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी, असं म्हटलं आहे. यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दानवेंना टोला हाणला आहे.

रेल्वेमंत्र्यांंकडून पहिल्यांदाच असं उत्तर आलं की, ही जबाबदारी घेणार कोण?, त्यामुळे आधीचे रेल्वेमंत्री होते त्यांनी जबाबदारीने काम केलं आहे, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी दानवेंना टोला हाणला आहे. त्यासोबतच त्यांना मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांनी काही गोष्टी सुचवल्याप्रमाणे त्यांनी त्या केल्या असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकार श्रेयासाठी काम करत नाही. लोकांची गैरसोय होऊ नये आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे लोकांचे जीव जाऊ नयेत असं आम्हाला वाटत असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, आम्हाला कोणत्याही वादात पडायचं नसून रेल्वे आम्हाला सहकार्य करेल अशी अपेक्षा असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. आतापर्यंत रेल्वेचं प्रशासन, मंत्री यांनी पूर्णपणे गेले दीड वर्ष सहकार्य केलं असल्याचंही ठाकरे म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

“सगळं केंद्राने करावं आणि केंद्राने द्यावं, मी फक्त मर्सिडीज चालवणार”

“लोकल सुरु करण्याबाबत दानवेंशी चर्चा करण्याची गरज नाही”

“कुठपर्यंत शांत बसायचं, शेवटी काही मर्यादा असतात, राष्ट्रवादीला आम्ही कधीही बुडवू शकतो”

देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात घट कायम; वाचा आजची आकडेवारी

शिल्पा शेट्टीच्या अडचणीत वाढ; आता आणखी एका आरोपामुळे चर्चेत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More