बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुख्यमंत्री घराबाहेर पडत नसल्याच्या टीकेला आदित्य ठाकरे यांचं सडेतोड उत्तर, म्हणाले…

मुंबई | काही दिवसांपुर्वी नाशिक, विरार आणि ठाणे येथे कोरोना रूग्णालयाला आग लागल्याची भीषण घटना घडली होती. यावरून विरोधीपक्षाने ठाकरे सरकारवर सडकून टीका केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी भेट न दिल्याने विरोधकांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली होती. आता त्यावर उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

एखादी दुर्घटना झाली की त्या ठिकाणी एक यंत्रणा काम करत असते. तिथे पोलीस, मेडिकल टीम, प्रसारमाध्यमं काम करत असतात. व्हीआयपी व्यक्तीने भेट दिली की तिथे काम करणारी सगळी यंत्रणा डायवर्ट होते. दुर्घटनेनंतर आरोग्यमंत्री, पालकमंत्री तिथे पोहोचून प्रत्येकाने जे काम करायचं असतं त्यासंबंधी सूचना देत असतात. खूप वेळा वॉररुममध्ये राहून सर्व कामकाज कसं सुरु असतं हे पाहायचं असतं आणि सध्या तेच अपेक्षित आहे, असं आदित्य ठाकरे यांनी संगितलं आहे.

केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सांगड घालून काम करायचं असतं ते दोन्ही जागांवरील प्रमुख करत असतात, असंही त्यांनी सांगितलं आहे. आम्ही गेल्यावर तिथे गोंधळ होतो. अर्धा पाऊण तास सगळं काही थांबलेलं असतं. आम्ही प्रतिक्रिया देत असतो, नंतर प्रसारमाध्यमं व्हीआयपी दौरा, टुरिझम अशी टीका करतात. सांत्वन फक्त टीव्हीवर येऊन करायचं नाही, तर कुटुंबाशी बोलून मदत कशी मिळेल हे पाहिलं पाहिजे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

दरम्यान, प्रत्येक जिल्ह्याचा एक पालकमंत्री असतो, तेथील काही ठराविक लोकप्रतिनिधी असतात. तिथे पोहोचून हवी ती मदत ते करत असतात. एकत्र काम केल्यानंतर प्रत्येकाने टीव्हीवर जाण्याची गरज नसते असं देखील आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ!

“देशातील जनतेला मूर्खात काढलं जातंय, सरकारविरोधात जनतेने बंड पुकारलं पाहिजे”

कोरोनाने मुलगा हिरावला, 15 लाखांची FD मोडून मेहता दाम्पत्याने केली कोरोना रूग्णांना मदत

“देशातील कोरोनाची परिस्थिती गंभीर, आता भाजप पुढारी कोणाकोणाचे राजीनामे मागणार आहेत?”

काँग्रेस खासदार राजीव सातव यांची प्रकृती खालावली; राहुल गांधींचा थेट डॉक्टरांना फोन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More