बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आदित्य ठाकरेंकडे मुख्यमंत्रीपदाचा चार्ज द्या”

मुंबई | उद्यापासून हिवाळी अधिवेशनाला (Winter Session) सुरूवात होणार आहे. यंदा हे अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईला होणार आहे. 22 ते 28 डिसेंबर या दरम्यान होणारं अधिवेशन होईल. अशातच अधिवेशनाआधी विरोधकांना चहापाण्याला बोलवण्याची परंपरा आहे. आज भाजपने सरकारकडून देण्यात येणाऱ्या चहापाण्यावर बहिष्कार घातला आहे. अशातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नुकतीच शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे यंदाचं अधिवेशन हे मुंबई घेण्यात येत असल्याची माहिती अनिल परब यांनी दिली होती. याच मुद्द्यावरून आता चंद्रकांत पाटील यांनी चिमटे काढले आहेत. आरोग्याच्या कारणावरुन राज्यावर अन्याय करु नका, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

राज्यातील जनतेनं 45 दिवसांपासून मुख्यमंत्र्यांना पाहिलेलं नाही. मुख्यमंत्र्यांनी लवकर बरं व्हावं. पण तोपर्यंत त्यांनी कुणाकडे तरी चार्ज द्यावा, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. हवं तर तिघांचं मिळून एक मंडळ तयार करा आणि आदित्य ठाकरे यांच्याकडे चार्ज द्या, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, उद्याच्या अधिवेशनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हजर राहणार का?, असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सवाल विचारला गेला त्यावेळी अजित पवार भडल्याचं पहायला मिळालं होतं.

थोडक्यात बातम्या-

तालिबान्यांचा गजब कारभार! चुकून शत्रू राष्ट्रालाच पाठवले कोट्यवधी रूपये

चंद्रकांत पाटलांचं ठाकरे सरकारला ओपन चॅलेंज, म्हणाले ‘जनतेच्या मैदानातही…’

मोठी बातमी! शिवसेनेच्या ‘या’ आमदाराची ईडीकडून तब्बल 8 तास चौकशी

Omicron किती धोकादायक?; आयसीएमआरने दिली ‘ही’ धक्कादायक माहिती

‘…असं काही घडलंच नाही’; 12 आमदारांच्या निलंबनावर अजित पवारांचं मोठं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More