महाराष्ट्र मुंबई

शरद पवारांच्या टीकेला आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणतात…

मुंबई | आमचं खत चांगलं आहे, त्यामुळे महाराष्ट्र हिरवागार आणि भगवा होणार, असं म्हणत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शरद पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त आदित्य ठाकरेंच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते.

भाजप-शिवसेना सत्तेचा गैरवापर करून नेत्यांना आपल्या पक्षात घेत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला होता. त्यावर भाजपच्या नेत्यांनी पलटवार करत पवारांच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, मी लावलेलं झाड विकासाचं आहे. सर्वच राजकीय पक्षांनी पर्यावरण रक्षणासाठी एकत्र आलं पाहिजे. आमचं खत चांगलं आहे. त्यामुळे आधी पावसाचं इनकमिंग होऊ दे!, असंही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-‘हा’ माजी आमदार म्हणतो… मी शिवसेनेकडून निवडणूक लढवणारच!

-पतीच्या चौकशीमुळे चित्रा वाघ घाबरल्या होत्या- शरद पवार

-‘या’ महिला आमदार म्हणतात… शरद पवार हेच आमचे कप्तान!

-“राष्ट्रवादी युवकमध्ये एकलव्य आहेत; साहेबांसाठी अंगठाच काय देहसुद्धा देऊ”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या