मुंबई | सतत भूमिका बदलणाऱ्यांसोबत आपण कधी युती करणार नाही, असा टोला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी मनसे प्रमुख राज ठाकरेंना लगावला आहे. ते मुंबईत बोलत होते.
आदित्यसंवाद या कार्यक्रमात एका तरूणाने मनसेसोबत युती करणार का असा सवाल केला, यालाच आदित्य ठाकरेंनी ठाकरे शैलित उत्तर दिलं आहे.
शिवसेना आणि भाजपची भूमिका कधीचं बदलली नाही. जे विरोधात आहेत ते सतत भूमिका बदलतात. असं म्हणत आदित्य ठाकरेंनी काका राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, भाजप आणि शिवसेनेची युती देशाच्या हितासाठी केली असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
-मतदानाच्या दिवशीच धनंजय महाडिकांचा सतेज पाटलांवर शाब्दिक वार
-आईची दशक्रिया विधी असतानाही बजावला मतदानाचा हक्क
-राज ठाकरेंच्या सभांचा चांगला प्रभाव पडेल- अजित पवार
-3 ते 5 लाखांसाठी मुली लैंगिक छळाचे गुन्हे दाखल करतात; काँग्रेस नेत्यांची असंवेदनशीलता
-मोदींनी मतदाना आधी घेतली आईची भेट
Comments are closed.