Loading...

युतीचं राज्य आल्यास मुख्यमंत्री???; आदित्य ठाकरे म्हणतात…

नाशिक | मुख्यमंत्री होण्यासाठी मी ही जन आशिर्वाद यात्रा काढलेली नाही तर मला हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करायचा आहे, असं मत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलं आहे. ते जन आशिर्वाद यात्रेच्यानिमित्ताने नाशिकमध्ये बोलत होते.

युतीचं राज्य आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? हा प्रश्न सातत्याने आदित्य ठाकरेंना विचारला जात आहे. त्यावर त्यांनी उत्तर दिलं आहे. याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी या विषयावर नेत्यांनी बोलू नये अशी तंबी दिली होती, असं म्हणत त्यांनी याविषयावर अधिकच बोलणं टाळलं.

Loading...

सरकारच्या कामाने आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीने विधानसभेवर भगवा फडकवणार असल्याचा विश्वास आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, शिवसेना विधानसभेवर भगवा फडकवेल आणि मुख्यमंत्री आदित्य ठाकरेच असतील, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत सातत्याने करताना दिसत आहेत.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या-

-दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शिला दीक्षित यांचं निधन

-धक्कादायक! व्यायामासाठी रस्त्यावर आलेल्या तीन मुलांना वाहनानं चिरडलं

-…म्हणून मी आणि प्रीतम मुंडे संसदेत हसलो- रक्षा खडसे

Loading...

-नारायण राणे कोणत्या मतदारसंघातून विधानसभा लढवणार?; नितेश राणे म्हणतात…

-पुण्याजवळील लोणी काळभोरजवळ भीषण अपघात; 9 विद्यार्थ्यांचा मृत्यू

Loading...