बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आदित्यजी, वडिलांकडे हट्ट धरा, हवंतर बाळासाहेबांचं नाव द्या पण ते काम पूर्ण करा”

अमरावती | चिखलदरा पर्यटन स्थळावर सिंगल केबलवरचा देशातील पहिल्या स्कायवॉक निर्मितीचं काम हाती घेण्यात आलं आहे. परंतू त्याचं काम सध्या अर्धवटच पडलेलं आहे. यावरून आमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे.

चिखलदऱ्याला हजारो पर्यटक दरवर्षी या ठिकाणी निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी येतात. मात्र याठिकाणी हातात घेण्यात आलेला सिंगल केबलचा स्कायवॉक अर्धवट स्थितीत आहे. आदित्यजी आपण पर्यटन मंत्री आहात. मुंबई, ठाणे, कोकणामध्ये ज्या प्रकारे विकास करण्यासाठी तुम्ही पुढाकार घेतला. जरा विदर्भाकडेही लक्ष द्या, असं नवनीत राणा यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव समृद्ध महामार्गाला दिलं आणि जलद गतीने त्या महामार्गाचे काम केलं जात आहे. तसेच चिखलदऱ्याच्या प्रकल्पालाही बाळासाबांचं नाव द्यायला देखील आमची काहीच हरकत नाही, परंतू त्या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावं, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे आदित्य ठाकरेंना केली आहे.

स्कायवॉक या प्रकल्पाचे काम पूर्ण झालं तर चिखलदऱ्याच्या पर्यटन विकासाचा हा एक टर्निंग पॉईट ठरू शकतो, असंही राणा आपल्या पत्रामध्ये म्हणाल्या आहेत. तसेच आदित्यजी ठाकरे यांनी लवकारात लवकर या प्रकल्पाचं काम पूर्ण केलं. तर आदिवासी महूळ बेळघाट, चिखलदऱ्याला न्याय, तेथील गोरगरीब आदिवासींना वाढणाऱ्या पर्यटनातून रोजगारीची चांगली संधी मिळेल, अशी अपेक्षाही नवनीत राणा यांनी व्यक्त केली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘लशींसाठी मोदींचे जाहीर आभार माना’; युजीसीची महाविद्यालयांना अजब सूचना

‘डेल्टा प्लस’ व्हेरियंटमुळे तिसरी लाट येणार का?; तज्ज्ञ म्हणतात…

आंबिल ओढा परिसरातील नागरिक आणि पोलीसांमध्ये तुफान राडा; नागरिकांकडून आत्मदहनाचा प्रयत्न

“महाविकास आघाडी सरकार हे शिवशाही सरकार नसून बेबंदशाही सरकार”

“सचिन वाझेच्या पुनर्नियुक्तीशी अनिल देशमुख यांचा थेट संबंध नाही”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More