उद्धव ठाकरे मोदींना ‘चोर’ म्हणाले, मग त्यांचं काय करायचं?- चंद्रकांत पाटील

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सध्या जन आशिर्वाद यात्रेच्या माध्यमातून दौरा करत आहेत. आपल्या या दौऱ्यात राणे यांनी शिवसेनेला लक्ष्य केल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना आणि राणे यांचा जुना वाद हा आता पुन्हा उफाळून आला आहे.

नारायण राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना आपल्या मर्यादा ओलांडल्या आहेत. मी उद्धव ठाकरेंच्या कानशिलात लगावली असती, असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं आहे. या वक्तव्याने आता महाराष्ट्रातील वातावरण प्रचंड तापलेलं आहे. महाराष्ट्रभर आंदोलन होत आहेत.

भाजप महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नारायण राणे यांच समर्थन करताना ठाकरे सरकार चुकीचं वागत असल्याचं म्हटलं आहे. प्रत्येकाची वेगळी शैली असते. नारायण राणेंचीही आहे. मी त्या शैलीचं समर्थन करत नाही. पण त्यासाठी थेट अटक करणं कितपत योग्य आहे? सरकारने, प्रशासनाने नारायण राणे यांना समज द्यायला हवी होती. मात्र थेट अटक करणं योग्य नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

नारायण राणे हे शिवसेनेच्या शैलीत बोलत असतात. त्यांना उत्तर देताना आपण पण शब्दांनीच उत्तर द्यावं. एका केंद्रीय मंत्र्यांना अटक करणं कितपत योग्य आहे, असा सवाल पण त्यांनी सरकारला विचारला आहे. उद्धव ठाकरे पण कितीदा तरी मोदींना काहीही बोलतात पण आम्ही काही म्हटलं का?, असा सवाल सुद्धा त्यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या 

दिल्लीत आमचं सरकार आहे लक्षात ठेवा, बघतो हे किती उड्या मारतात- नारायण राणे

“खऱ्या आईचं दुध पिलं असेल तर समोर या, तुमची औकात दाखवून देऊ”

‘मी नॉर्मल माणूस वाटलो काय?’; गुन्हा दाखल झाल्यानंतर नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया

नाशिकमध्ये शिवसैनिक आक्रमक, दगडफेक करत भाजपचं कार्यालय फोडलं

“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राणेंना मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला सांगावा”

BjpBJP chandrakant patilBJP narayan raneLETEST MARATHI NEWSPoliceUddhav Thackerayखासदार नारायण राणेचंद्रकांत पाटीलभाजपशिवसेनासरकार