बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कौतुकास्पद! मुलीला पाठीवर घेऊन नदी ओलांडणाऱ्या महिला नर्सचा फोटो व्हायरल

रांची | सध्या देशभरात कोरोनानं डोकं वर काढलंय. अशात आरोग्य यंत्रणा दिवसरात्र एक करत कामाला लागली आहे. या महामारीनं आपण सगळेच घरात अडकलेलो आहोत. मात्र असं असतानाही आपली आरोग्य यंत्रणा कोरोनाला रोखण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. अशातच सध्या एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोतल्या महिला नर्सचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

व्हायरल होणाऱ्या या फोटोमध्ये झारखंड येथील महिला नर्स मुलीला पाठीवर बांधून नदी पार करत आहे. नदी ओलांडून दुर्गम भागातील लहान मुलांचे लसीकरण करण्यासाठी ही नर्स प्रयत्न करत आहे. या महिला नर्सचं नाव मानती कुमारी असं आहे.

मानती तिच्या दीड वर्षाच्या चिमुकलीला पाठीवर घेऊन आसपासच्या गावात लहान मुलांचे लसीकरण करण्यासाठी जाते. मानती कुमारी प्रत्येक महिन्याला अक्सी पंचायतीच्या एका गावात लहान मुलांच्या लसीकरणासाठी जात असते. मुसळधार पावसामुळं एका आठवड्यापासून नदीच्या पाण्यात वाढ झाली आहे. मात्र मी काम थांबवू शकत नाही असं ती म्हणाली.

दरम्यान, कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी सध्या एकमेव उपाय म्हणजे लसीकरण. 21 जून पासून देशातील 18 वर्षावरील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली होती. त्यामुळे लसीकरण मोहिमेसाठी आरोग्य कर्मचारी काम करत आहेत. देशातील अनेक दुर्गम भागात पोहचून आरोग्य कर्मचारी लसीकरण करत आहेत.

 

थोडक्यात बातम्या – 

धक्कादायक! मुंबईत बेशुद्ध अवस्थेत असलेल्या रूग्णाचे डोळे उंदराने कुरतडले

‘कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यावर बाहेर पडा पण…’; आरोग्य मंत्रालयाने दिला ‘हा’ महत्वाचा सल्ला

भाजप नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची गाडी अडवली, नार्वेकर म्हणाले, ‘यांना गाडीत टाका शिवबंधंन बांधू’

पैज लावून सांगतो देशात कोरोनाची तिसरी लाट येणार नाही- राकेश झुनझुनवाला

सरकार कोरोनाला नाही तर विरोधकांना घाबरत आहे- चंंद्रकांत पाटील

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More