बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कौतुकास्पद! रूग्णांना त्वरित रक्त मिळण्यासाठी अभिनेता सोनू सूदनं उचललं ‘हे’ मोठं पाऊल

मुंबई | कोरोनाच्या काळात अभिनेता सोनू सूदचं काम वाखणण्याजोगं होतं. मुंबईतील परप्रांतीय मजूरांना आपल्या गावी परतविण्यासाठी सोनूनं मोठं अभियानचं राबवलं होतं. मात्र आता चक्क सोनूनं यापुढे जाऊन एक मोठं पाऊल उचललं आहे. रूग्णांना रक्ताचा पुरवठा त्वरित व्हावा यासाठी सोनूनं ‘सोनू फाॅर यू’ नावानं एक अॅप सुरू केलं आहे.

रक्ताची गरज असणारा रूग्ण आणि रक्तदान करू इच्छिणारा व्यक्ती यांना जोडण्यासाठी हा अॅप महत्वपूर्ण कामगिरी पार पाडणार आहे. सोनू सूदनं स्वतः ट्विटरवर यासंबंधीचा व्हिडीओ शेअर करत माहिती दिली आहे. सेोनूच्या या नव्या उपक्रमाचा राज्यातील अनेक गरजू रुग्णांना फायदा मिळणार आहे.

रक्ताच्या अभावी दर दिवशी 12000 लोकांना आपल्या जीवाला मुकावं लागत आहे. एखाद्याचा जीव वाचविण्यासाठी तुम्ही डाॅक्टर असणंच गरजेचं नाही तर तुमच्या आयुष्यातील 20 मिनीटेही एखाद्याचं आयुष्य वाचवू शकतील. रक्तदान करणं यासाठी गरजेचं आहे, अशा आशयाचं ट्विट सोनूनं आपल्या ट्विटरवरून केलं आहे.

दरम्यान लाॅकडाऊनच्या काळात मजूरांना केलेल्या मदतीनं सोनू चांगलाच चर्चेत आला होता. सोनूनं या कामासाठी बरीच आर्थिक मदतही देऊ केली होती. सोनूच्या या नव्या अॅपमुळे आता अनेक गरजू रूग्णांना तातडीनं रक्त मिळवण्यात मदत होणार आहे. राज्यातील अनेक रुग्णालयात रक्ताचा नेहमीच तुटवडा असल्याचं बघायला मिळतं. अपुरं होणार रक्तदान हे त्यामागचं प्रमुख कारण आहे. नागरिकांनी रक्तदान शिबीरात हिरीरीनं सहभागी होण्यासाठी सोनूचा हा उपक्रम महत्वाचा ठरणार आहे.

 

थोडक्यात बातम्या-

 

“मी फोटो पाहिलेत, हात बांधून कोणी आत्महत्या करत नाही”

आमदार अरुण लाड यांनी विधानपरिषदेत पदवीधारकांसाठी केली ‘ही’ मोठी मागणी

देवेंद्र फडणवीसांचे तृतीयपंथीयाशी समलैंगिक संबंध असल्याचं म्हणणाऱ्याला अटक

पुणेकरांनो सावधान! ‘कोरोना’ शहरात फोफावतोय, पाहा आजची आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More