बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कौतुकास्पद! 11 वर्षीय मुलीने साडी घालून स्केटींग करत केली लसीकरणाची जागृती

लखनऊ | कोरोनाने देशात प्रचंड थैमान घातलं आहे. अशातच लसीकरण देखील सुरु करण्यात आलं आहे. मात्र अनेक लोक लस घेण्यास टाळाटाळ करत आहेत. एवढच काय तर अनेकांनी अद्याप लस देखील घेतली नाही आहे. अशातच एका 11 वर्षीय मुलीने स्केटींग करत लसीकरणाबाबत जनजगृती करत असतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

उत्तर प्रदेशच्या सीतापूरमध्ये कोविड-19च्या लसीकरणाविषयी जागृती करण्याचं काम एका 11 वर्षाच्या मुलीने केलं आहे. हे काम करण्यासाठी ती साडी घालून स्केटिंग करत नागरिकांना लसीकरणाविषयी जागृत करत आहे. या मुलीचा स्केटिंग करण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आला असून या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये या मुलीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मुलगी उत्तर प्रदेश राज्यातील सीतापूरमधील रामकोट गावात राहते. या मुलीची स्केटिंग पाहून गावातील नागरिक आचंबित झाले आहेत. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी देशाच्या प्रत्येक भागात लसीकरण करण्यात येत आहे. पण ग्रामीण भागातील नागरिक लस घेण्यास घाबरत आहेत.

दरम्यान, ग्रामीण भागातील फक्त 15 टक्के लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रुग्ण अढळत असून मृत्यूदर देखील वाढला आहे.ज्या भागात लसीकरणाविषयी जागृकता नाही, अशा ग्रामीण भागात असा उपक्रम करणं तेपण एका 11 वर्षाच्या मुलीकडून केला जाणे हे कौतुकास्पद आहे.

पाहा व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by Mirror Now (@mirrornow_in)

थोडक्यात बातम्या-

ब्रेकींग! शिवसेना भवनासमोर आंदोलनात भाजप-सेनेचे कार्यकर्ते आमनेसामने

भाच्याची गाडी अडवल्याने महिला आमदारने लगावली पोलिसाच्या कानशिलात

‘सगळं काही मॅनेज झालं असं….’; अजित पवारांच्या त्या फोन कॉलबाबत संभाराजेंनी केला गौप्यस्फोट

“शिवसेना कुणाच्या इशाऱ्यावर नाचते हे जगाला ठाऊक पण रामकार्यात तंगड घालाल तर…”

छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्मिळ चित्रांचा शोध; तीन शिवकालिन चित्र परदेशातील संग्रहालयात

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More