Top News पुणे महाराष्ट्र

कौतुकास्पद! पुण्यातील चिरागने अमेरिकेतील ‘एमआयटी’त मिळवला प्रवेश

पुणे | जगातील सर्वोत्तम इंस्टिट्यूट मानल्या जाणाऱ्या अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी एमआयटीमध्ये प्रवेश मिळवणे अत्यंत कठीण मानलं जातं. मात्र पुण्यातील चिराग फलोरने या इंस्टिट्यूटमध्ये प्रवेश मिळवला आहे.

एमआयटीसारख्या मोठ्या आणि नावलौकीत कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळाले असताना देखिल चिरागने जेईई ही परीक्षा दिली आणि त्याने त्यात बारावा क्रमांक पटकवला आहे. जानेवारीत पार पडलेल्या जेईई मेन्समध्ये चिरागला 99.98796 टक्के मिळाले होते. त्याने सप्टेंबरमध्ये पुन्हा प्रयत्न केला आणि 100 टक्के मिळवले.

मी आयआयटीच्या प्रवेशची तयारी गेले चार वर्षापासून करतं होतो. म्हणून मला त्या परीक्षेला सामोरे जाण्याची इच्छा होती. मी हे खात्रीने सांगू शकतो की आयआयटीची परीक्षा सर्वात कठीण परीक्षा असते. तसेच आयआयटीच्या प्ररीक्षेसाठी खुप तयारी करावी लागते, असं चिराग फलोर याने सांगितलं आहे.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर चिरागला अद्याप अमेरिकेचा व्हिसा मिळालेला नाही. त्यामुळे सध्या तो ऑनलाईनच्या माध्यमातून एमआयटीत शिकत आहे. चिराग 27 सप्टेंबर रोजी होणाऱ्या जेईई अॅडवान्स या परीक्षेची तयारी करतं आहे.

महत्वाच्या बातम्या-

…ही असंवेदनशीलता भयावह आहे; मोदी सरकारवर सुप्रिया सुळे संतापल्या!

मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, आंदोलनाच्या तारखा केल्या जाहीर

‘या’ माजी आमदाराचा अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

पुणे विद्यापीठाचा अंतिम वर्षाच्या परीक्षेचा आराखडा जाहीर

पुण्यातील ‘या’ सोसायटीमध्ये एकही कोरोना रुग्ण नाही

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या