बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कौतुकास्पद! 5 रूपयांसाठीच्या अपमानामुळे आज ‘ती’ करतीय लोखोंचा व्यवसाय

सोलापूर | आपल्यावर कितीही वाईट परिस्थिती असली आणि कितीही संकट आली असलीत तरी आपल्यामध्ये जिद्द असेल तर आपण कोणतीही गोष्ट मिळवू शकतो. त्यापासून आपल्याला कोणीही अडवू शकत नाही. या सगळ्या गोष्टी सोलापूर जिल्ह्यातील बर्शी उपळाईच्या स्वीती ठोंगे यांनी खऱ्या करून दाखवल्या आहेत. संकटांना न जुमानता स्वाती ठोंगे ही महिला सोलापूर जिल्ह्यातील लोखांचा व्यवसाय करणारी महिला आहे.

2006 साली स्वाती यांचं त्यांच्या घरच्यांनी लग्न लावून दिलं. मात्र नशिबापुढं आपलं काहीच चालत नसल्यानं चार वर्षातच स्वाती यांचे पती वारले आणि सुखी संसार बसला. त्यावेळी हातात 2 वर्षाचा मुलगा आणि साडे तीन महिन्यांची मुलगी, अशा परिस्थितीत सासरच्या लोकांनी तिची व तिच्या मुलाची जबाबदारी घेण्यास नकार दिला. एकदा त्यांच्या मुलाने त्याचा चुलत्याकडे 5 रूपये मागतीले, त्यावेळी त्या काकाने त्याचा खूप अपमान केला होत.

त्यानंतर स्वातींनी बचत गटात जाण्याचा निर्णय घेतला. तसंच व्यवसाय करण्याची तशी त्यांनी आधीपासूनच इच्छा होती. त्यानंतर व्यवसाय कसा करायचा याचा जम बसल्यानंतर त्यांनी उडीद आणि साबू पापडाचा व्यवसाय करण्याची इच्छा केली.

दोन महिलांना सोबत घेऊन त्यांना त्या विषयी प्रशिक्षण देऊन त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. यामध्ये चांगला जम बसल्यावर स्वाती यांनी आपली मैत्रीण रोहिणीला सोबत घेऊन स्वदेशी मार्केटिंग कंपनी सुरू केली. ही कंपनी केवळ बचत गटातील महिलांच्या वस्तू खरेदी करते आणि त्या वस्तु,पदार्थ बार्शी, सोलापूर, मुंबई, पुणे अशा ठिकाणी पाठवले जातात. स्वाती यांच्या मार्फत सध्या अनेक महिला आज घरी बसून महिन्याला 25 ते 30 हजार रुपये कमवत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

धक्कादायक! प्रियकरासोबत मिळून आईने केली पोटच्या पोराची हत्या

धक्कादायक! अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर चाकूने हल्ला

‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्राच्या ‘या’ लुकने चाहते घायाळ, पाहा फोटो

कौतुकास्पद! कोरोनायोद्ध्यांना गरम होऊ नये म्हणून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने बनवलं अनोखं ‘कुल पीपीई किट’

‘या’ नेत्यानं चक्क धनगरी वेश परिधान करून केला जागर; समाजाला आरक्षणासाठी केलं आवाहन

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More