Top News देश

कौतुकास्पद! चौथीपर्यंत शिकलेल्या आजोबांनी तयार केली 4 भाषांमध्ये डिक्शनरी

केरळ | सध्याच्या काळात डिजीटल सगळ्या गोष्टी असल्यामुळं एका क्लिकवर आपल्याला हवी ती माहिती हव्या त्या भाषेमध्ये उपलब्ध होते. परंतू अजूनही ज्या लोकांचा या सगळ्याशी काहीही संबंध नाही त्यांच्यासाठी यासगळ्यासाठी पुस्तक हे एकच माध्यम आहे. याच पार्श्वभूमीवर चौथीपर्यंत शिकलेल्या आजोबांनी 4 भाषांमध्ये डिक्शनरी तयार केली आहे.

वयाच्या 83 व्या वर्षी नजात्तेला श्रीधरण यांनी ही डिक्शनरी तयार केली आहे.आश्चर्याची बाब म्हणजे श्रीधरण यांचे शिक्षण केवळ इयत्ता चौथीपर्यंतच झालेलं आहे. ही डिक्शनरी म्हणजे श्रीधरण यांच्या 25 वर्षांची मेहनत आहे.

केरळच्या तालासरी परिसरात श्रीधरण राहत आहेत. त्यांनी दक्षिण हिंदुस्थानात बोलल्या जाणाऱ्या तमीळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा चार भाषांमध्ये डिक्शनरी तयार केली. त्यांच्या डिक्शनरीत मल्याळम शब्दासाठी कन्नड, तमीळ आणि तेलुगूमध्ये अर्थ सापडतो.

नजात्तेला श्रीधरण म्हणाले की, “चौथीत शाळा सोडल्यावर मी बिडी बनवण्याच्या कारखान्यात काम केले. पुढे ईएसएलसी परीक्षा पास करून सार्वजनिक बांधकाम विभागात काम केले. त्यादरम्यान मी शब्दकोशावर काम करायला सुरुवात केली. 1994 ला स्वेच्छानिवृत्ती नंतर माझा सर्व वेळ शब्दकोशासाठी दिला.”

थोडक्यात बातम्या-

…अन् इंदोरीकर महाराज ढसाढसा रडले; पाहा व्हिडीओ

मराठी नंबर प्लेटवर कारवाई ही मातृभाषेची गळचेपी- राजू पाटील

अकरावी, आयटीआय आणि इतर प्रवेश प्रक्रियांचा मार्ग आता झाला मोकळा!

‘तो’ निर्णय माझा व्यक्तिगत नव्हता, सरकारचा होता- नितीन राऊत

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अपघात; पत्नीचा जागीच मृत्यू

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या