बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कौतुकास्पद! गरजूंना मोफत जेवण देणाऱ्या ‘या’ व्यक्तीचा ब्रिटनकडून सन्मान

हैद्राबाद | आपण समाजाचं देणं लागतो म्हणून अनेकांना समाजासाठी काहीतरी करण्याची आवड असते. असंच काहीसं हैद्राबादच्या 41 वर्षीय सय्यद उस्मान अझर मकसुसी यांनाही वाटत होतं. गरीब नागरिकांना आणि आधार नसलेल्या लोकांचं पोट भरण्यासाठी मदत करायची म्हणून सय्यद यांनी प्रचंड मेहनत घेतली. याच मेहनतीची आणि दानशूरतेची दखल थेट ब्रिटननं घेतली आहे.

सय्यद यांनी गरजूंची दोन वेळची भूक भागावी, त्यांना जेवण मिळावं यासाठी सुरुवातीला अतिशय छोट्या स्तरावर प्रयत्न सुरु केले होते. मात्र आता त्यांच्या या कामाला दहा वर्षांत खूप मोठं स्वरुप प्राप्त झालं आहे. सद्यस्थितीत सय्यद हे दररोज 1500 लोकांच्या मोफत जेवणाची व्यवस्था करतात. त्यांच्या या चांगल्या कामासाठी त्यांना ब्रिटनचा ‘कॉमनवेल्थ पॉईंट ऑफ लाइट’ पुरस्कार जाहीर झाला आहे.

पुरस्कार जाहीर झाल्यावर सय्यद यांनी आपलं मत व्यक्त करताना म्हटलं की, कॉमनवेल्थ पॉइंट्स ऑफ लाइन पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल ब्रिटीश डेप्यूटी हायकमिशनचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. मला खूप आनंद आणि अभिमान वाटतो. या पुरस्कारामुळे यापुढे आणखी उत्साहानं काम करण्याची मला प्रेरणा मिळाली.

दरम्यान, सय्यद उस्मान अझर मकसुसी यांनी 2015 साली सैनी वेल्फेअर फाऊंडेशनच्या नावानं एक सामाजिक संस्था सुरू केली होती. ‘दो रोटी’ कॅम्पेनच्या माध्यमातून त्यांनी हैदराबादमधील गरजूंना जेवण मिळवून देण्यासाठी आवाहन केलं होतं. त्याचबरोबर भुकेला कोणताही धर्म नसतो या बोधवाक्यावर चालणाऱ्या सय्यद यांनी कोरोना काळात गरीबांना अन्न मिळवून देण्यासाठी खूप मेहनत घेतली.

थोडक्यात बातम्या – 

मुंडे भगिनी नाराज?, देवेंद्र फडणवीस म्हणतात…

“शिवसेनाप्रमुखांना राणेंची उंची माहित होती, म्हणूनच त्यांना मुख्यमंत्रिपदी बसवलं”

शुभेच्छा देण्याइतकं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मन मोठं नाही – नारायण राणे

‘तुम्हाला लाज वाटली पाहिजे’; भाजप नेत्याच्या ‘त्या’ ट्वीटवर उर्मिला मातोंडकर भडकल्या

अभिमानास्पद! पुण्याच्या चिमुकलीनं जागतिक विक्रम करत 3 रेकाॅर्ड बुकमध्ये नोंदवलं नाव

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More