बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कौतुकास्पद! भर पावसात जेसीबी चालकाची माणुसकी, पाहा व्हिडीओ

मुंबई | सध्या कोरोनाने सगळीकडे हैदास घातला आहे. प्रशासन आणि आरोग्ययंत्रणा युद्धपातळीवर कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कोरोनाच्या महामारीच्या काळात अनेकजण माणूसकीचा आदर्श घालताना दिसत आहे. अशातच सध्या व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमधून माणुसकीचं दर्शन झालेलं पाहायला मिळत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये मुसळधार पावसामुळे दुचाकीस्वार रस्त्याच्या बाजूला उभा राहिला आहे. शेजारीच असणाऱ्या जेसीबी चालकानं त्या दुचाकीस्वाराला आसरा दिल्याचं दिसून येत आहे. या व्हिडीओतील जेसीबी चालकावर सध्या कौतुकांचा वर्षाव होताना दिसत आहे.

हा व्हिडीओ आयएएस अधिकारी अवनिश शरण यांनी ट्विटरवरुन शेअर केला आहे. शरण यांनी या व्हिडीओला मार्मिक कॅप्शनही दिलं आहे. कॅप्शन देत त्यांनी म्हटलं की, जिथं शक्य आहे, तिथं ही माणूसकीची दयाळूपणाची भावना जपा, ते नेहमी शक्यही असतं.

दरम्यान, कोरोनाच्या महामारीच्या काळात जात, पात न पाहता सर्वजण काम करत आहेत. पण आपली रक्ताची नातीच उलट या काळात साथ सोडून देत असल्याचं चित्र दिसत आहे आणि अशावेळी माणुसकी कामाला येते. याचाच आदर्श या व्हिडीओतून पाहिला मिळत आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

वर्ल्ड रेकॉर्डसाठीच मोदी सरकारची साठेबाजी?- पी. चिदंबरम

राष्ट्रवादीतील प्रस्थापितांना दे धक्का, जयंत पाटलांच्या आणखी एका नातेवाईकाला मोठं पद!

“कोरोनाचे नियम पाळूच पण मूर्ती मात्र उंचच आणू”

“ठाकरे सरकार कायद्याने चालत नाही हे राष्ट्रपतींना कळवा”

पुणे कोरोनामुक्तीच्या वाटेवर; सक्रिय रूग्णसंख्येसह नव्या बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More