बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कौतुकास्पद! संकटाला आनंदाने सामोरं जाणाऱ्या पुण्याच्या आजीला नेटकऱ्यांनी केला सलाम

पुणे | प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी अडचणी असतात. त्या आयुष्यात आपल्याला अनेक अशी लोक भेटतात जे आपल्याला प्रचंड प्रेरणा देतात. त्यांची प्रेरणा पाहून आपल्याला आपली संकटं कमी वाटतात. असंच काहीसं रतन आजींच्या बाबतीत देखील आहे. रतन आजींच्या कहाणीने अनेक तरुणांना प्रेरणा दिली आहे. केवळ तरुणच नव्हे तर प्रत्येकाला त्यांच्याकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे.

पुण्यातील एमजी रोडवर रतन आजी पेन विक्री करतात. हे पेन एका बाॅक्समध्ये ठेवले असून ते त्या फिरत-फिरत विकतात. मात्र या पेनच्या बाॅक्सवर जे लिहिलं आहे. त्याने सर्वांचं मन जिंकलं आहे. या बाॅक्सवर मला भीक नाही मागायची, कृपया 10 रुपयांचा निळा पेन घ्या, धन्यवाद, आशीर्वाद, असं लिहिलं आहे.

एका तरुणीने या आजींची एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये या आजींच्या निर्मळ हास्याने मला त्यांच्याकडून पेन घेण्यास भाग पाडलं असल्याचं तरुणीने लिहिलं आहे. हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून सर्वत्र रतन आजींचं कौतुक केलं जात आहे.

दरम्यान, म्हातारवयात रतन आजी त्यांच्या क्षमतेनुसार कष्ट करतात. त्यांच्या संकटांवर हसत मात करतात. ही बाब अनेकांना प्रेरणा देणारी आहे. या फोटोवर अनेक युझर्सने आजींना सलाम केला आहे.

पाहा पोस्टः

 

View this post on Instagram

 

A post shared by Shikha Rathi (@sr1708)

थोडक्यात बातम्या-

‘या’ कारणामुळे भारतीय हवाई हद्दीत घुसलं शेजारील देशाचं विमान

महाराष्ट्रातील ‘या’ तालुक्याने रचला इतिहास, केलं 100 टक्के लसीकरण पुर्ण

“प्रेयसीनं दगा दिला म्हणजे प्रियकराला…”; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपुर्ण निकाल

साखर कारखान्याच्या निवडणुकीत एका मतासाठी 3 हजार मोजले, पार्ट्या केल्या अन्…; शिवसेना आमदाराची कबुली

“फडणवीसांनी याचे पुरावे सादर करायला हवे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More