बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कौतुकास्पद! कोरोना काळात उपासमार होणाऱ्या 500 माकडांना पोलिस हवलदाराची मदत

रायपुर | देशात सर्वत्र कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोना काळात एकीकडे माणूस माणसाला टाळू लागला आहे. तर दुसरीकडे काही लोक माणुसकी जिवंत असल्याची अनुभती देत आहेत. असाच काहीसा प्रकार सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोतून निदर्शनास येत आहे.

व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये पोलीस हवलदार राजेश पटेल यांनी कोरोना काळात दाखवलेली भूतदया सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. विशेष बाब म्हणजे पोलिस हवलदार राजेश पटेल हे कुदरगड धाम या तिर्थक्षेत्र परिसरातील सुमारे 500 माकडांना दररोज खायला घालत आहेत.

याविषयी बोलताना राजेश यांनी सांगितलं की, लाॅकडाऊनमुळं येथे भाविक येणं बंद झालं आहे. त्यामुळं येथील माकडांची उपासमार होते. म्हणून मी दररोज जवळपास पाचशे माकडांना खायला घालतो. वनविभागानं याबाबतची दखल घेऊन माकडांची उपासमार थांबवायला हवी, अशीही मागणी राजेश यांनी केली.

दरम्यान, या फोटोनं सर्वांचंच मन जिंकलं आहे. अनेकजण या फोटोला पाहून भावूकही झालेले पहायला मिळाले. कोरोना काळात अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. या संकट काळात अनेक लोक मदतीचा हात पुढे करताना दिसत आहे.

पाहा फोटो – 

 

थोडक्यात बातम्या – 

नदी पार करण्यासाठी कोरोना योद्धांनी लढवली अनोखी शक्कल, फोटो होतोय व्हायल

…अन् बेस्ट बसच्या ड्रायव्हर काकांनी बसमध्येच उघडली छत्री, पाहा व्हिडीओ

‘पंतप्रधानांच्या भेटीला विरोधी पक्षाला सोबत घ्यायला हवं होतं’; फडणवीसांना राऊतांचं प्रत्युत्तर

“माझं भारतात पाऊल पडताच कोरोना संपणार”

शाब्बास रे पठ्ठ्या! सर्वाधिक गोलच्या स्पर्धेत भारताचा सुनिल छेत्री मेसीपेक्षा सरस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More