बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुसळधार पावसात जखमी बाप-लेकीच्या मदतीला धावले पोलीस, पाहा व्हिडीओ

मुंबई | कोरोनाच्या महामारीनं लोकांना हैराण करून सोडलं आहे तोच दुसरीकडे आता मुंबईकरांना मुसळधार पावसामुळे अडचणींना सामोरं जावं लागत आहे. मुसळधार पावसामुळे पाण्याचा प्रवाह वाढल्यानं अनेक ठिकाणी लोक अडकून पडले आहेत. अशातच मुंबई पोलिसांनी बाप-लेकीला मदत केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सध्या मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे. त्यामुळे सामान्यांची गैरसोय होत असलेली पाहायला मिळत आहे. यातच मुंबई पोलिसांनी आपलं कर्तव्य अचूक बजावलं असल्याचं व्हायरल व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे. व्हिडीओमध्ये जखमी बाप-लेकीला गुडघ्याभर साचलेल्या पावसातून मुंबई पोलिसांनी बाहेर काढल्याचं दिसून येत आहे.

पोलिसांनी केलेल्या मदतीसाठी त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आहे. या व्हिडीओसोबत #आम्हीड्युटीवरआहोत असा हॅशटॅगही देण्यात आलेला आहे.

दरम्यान, रविवारी सकाळ पासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक ठिकाणचे मोठे नाले भरून वाहत आहेत. त्यामुळे काही ठिकाणी रहदारी बंद झाली होती. मुसळधार पावसामुळे अनेकांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं पाहायला मिळत आहे. लोकांना खबरदारी घेण्याचं आवाहनही प्रशासनाकडून देण्यात येत आहे. मुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवला जात आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

“आम्ही दिवा स्वप्न पाहत नाही, आमचं स्वप्न 2024ला पूर्ण करू”

“लोक पावसामुळे मेली तरी मुख्यमंत्री महोदय घर सोडायला तयार नाहीत”

गब्बर सेनेकडून लंकादहन; 7 गडी राखून भारताचा श्रीलंकेवर दमदार विजय

‘…तेव्हा वडिलांच्या औषधांसाठीही पैसे नव्हते’; वडिलांच्या आठवणीत नाना भावूक

“जास्त आगाऊपणा करू नका, जेवढी स्क्रिप्ट दिली, तेवढंच बोला”

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More