मुंबई | बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने लॉकडाऊनच्या काळापासून अनेक गरजू लोकांना मदत केली आहे. आता तो एका रिक्षा चालकाला त्याचा हात बसवून देणार आहे. त्याच्या या कामगिरीमुळे सोशल मीडियावर त्याचं खूप कौतुक होत आहे.
कुणाल सिंह राजपूत नावाच्या एका ट्विटर यूजरने सोनू सूद आणि नीति गोयल यांना टॅग करून एक ट्विट केलं. माझ्या शेजाऱ्याचा एका अपघातात हात जखमी झालाय. सहा महिन्यांच्या उपचारानंतरही तो बरा होऊ शकलेला नाही. कारण त्याच्यावर योग्य उपचार होत नाहीयेत. तो रिक्षा चालवून आपल्या परिवाराचं पोट भरतो. घरात कमावणारा तो एकटाच आहे. त्याला लहान मुलं आहेत. लवकर उपचार केले नाहीत तर त्याचा हात कापावा लागेल, असं कुणालने सांगितलं. यावर सोनूने उत्तर दिलं आहे.
हात असा कसा कापू देऊ भाऊ? तुमची सर्जरी 12 ऑक्टोबरला फिक्स आहे. तुमच्या रिक्षात कधीतरी फिरवाल, असं सोनू म्हणाला. सोनूच्या या कामाचं सोशल मीडियातून भरभरून कौतुक केलं जात आहे.
हाथ कैसे कटने देंगे भाई ?
आपकी सर्जरी 12th Oct को फ़िक्स है।
अपनी ऑटो में घुमा देना कभी। ❣️ https://t.co/JlgNfV8gjT— sonu sood (@SonuSood) October 4, 2020
महत्वाच्या बातम्या-
आमच्यात संस्कार आहेत म्हणून आम्ही तुमची थोबाडं फोडली नाही- यशोमती ठाकूर
कोरोना लस कधी मिळणार?; आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
काँग्रेसचे डी.के शिवकुमार यांच्या घरावर सीबीआयचा छापा
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करा- दादा भुसे