बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कौतुकास्पद! गरजूंच्या मदतीसाठी पुढे सरसावली सनी लियोनी, केलं अन्नाचं वाटप

मुंबई | देशाच्या विविध भागात कोरोनानं हातपाय पसरले असून, रुग्णसंख्येचा तोल सांभाळताना आरोग्य व्यवस्था डगमगताना दिसत आहे. कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा सामान्य जनतेपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांवर परिणाम होत आहे. या संकट काळात अनेकजण आपापल्या परीनं मदत करत असल्याचं दिसून येत आहे. अशातच अभिनेत्री सनी लियोनी आणि तिचा पती डेनियल वेबर यांनी देखील गरजूंना मदत केली.

कोरोना काळात अनेक लोकांवर उपासमारीची वेळ झाली आहे. दोन वेळच्या जेवणासाठीही तारेवरची कसरत करावी लागत आहे. गरजुंसाठी सनी लिओनीनं पुढाकार घेतला आहे. सनी लियोनी आणि तिचा पती डेनियल वेबरनं गरजूंना अन्नदान केलं. ट्रॅकमधून फूड पॅकेट्स वाटतानाचे त्या दोघांचे फोटोज समोर आले आहेत.

आपलं मत व्यक्त करताना सनी लिओनी म्हणाली, ‘अशा कठीण परिस्थितीत अनेकांसमोर मोठी चिंता आहे ती म्हणजे, मी माझ्या कुटुंबाला किंवा मुलांना खायला कसं देणार? त्यामुळं अगदी मनापासून मी हे काम करतेय.’

दरम्यान, मिलियन डॉलर व्हेगन ही आंतरराष्ट्रीय स्तरावरची स्वयंसेवी संस्था आहे आणि जागतिक स्तरावरही ही मोहीम राबवत आहे. आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था मिलियन डॉलर वेगननं कोरोनामुळं ज्या लोकांचे हाल होत आहेत अशा लोकांना थेट मदत करण्यासाठी किमान 100,000 जेवण देण्याचं वचन दिलं आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

थोडक्यात बातम्या – 

नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द केल्याने शिवसेनेचा जल्लोष

बाॅलिवूडवर शोककळा! कास्टिंग डिरेक्टर सहर अली लतीफ यांचं निधन

आनंदाची बातमी! ‘इतक्या’ रूपयांनी स्वस्त झालं सोनं; वाचा तुमच्या शहरातील सोन्याचा भाव

आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा शिथील करावी; मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी

20 फुटाच्या चेंबरमध्ये पडल्यानंतर तरुण 25 सेकंदात दुसऱ्या चेंबरमधून बाहेर, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More