बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मरावे परी कीर्तीरूपे उरावे! ब्रेन डेड असूनही मुलाने वाचवले 7 जणांचे प्राण, आरोग्यमंत्रीही अंत्यसंस्काराला हजर

नवी दिल्ली | केरळमधील एका विद्यार्थ्यामुळे 7 जणांचे प्राण वाचले आहेत. या तरुणाचं नाव नेवीस असं असून तो अवघ्या 25 वर्षांचा होता. नेवीस फ्रान्समधून अकाऊंट्समधील मास्टर डिग्री घेत होता. मात्र कोरोना काळात तो केरळला आपल्या परिवाराकडे आला होता.

केरळमध्ये नेवीस ऑनलाईन क्लास करत होता. यादरम्यान एक दिवशी त्याची प्रकृती खालावली आणि तो झोपेतून उठलाच नाही. त्यामुळे त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात नेण्यात आलं. त्याच्यावर उपचार करुन देखील तो झोपेतून उठत नव्हता मात्र त्याचा श्वास सुरु होता.

नेवीसची तब्येत बरी होत नसल्याने त्याला दुसऱ्या रुग्णालयात हालवण्यात आलं. तिथं डाॅक्टरांनी त्याचा ब्रेन डेड झाल्याचं घोषित केलं. यानंतर इच्छा नसताना देखील नेवीसच्या पालकांनी त्याचं अवयवदान करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, नेवीसचे डोळे, ह्रदय, हात, किडनी आणि फुफ्फुस गरजू लोकांना दान करण्यात आले. ज्यामुळे सात लोकांचे प्राण वाचले. यानंतर स्वतः आरोग्यमंत्री नेवीसच्या अंतिमसंस्काराला उपस्थित राहिले. या घटनेनंतर नेवीसचं आणि त्याच्या कुटुंबाच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक केलं जातं आहे.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

“मुस्लिम आणि ख्रिश्चन लोकांचं नागरिकत्व काढून भारताला ‘हिंदू राष्ट्र’ म्हणून घोषित करा”

वाहह! आता सुईशिवाय दिली जाणार लस, कसं ते जाणून घ्या

“गोव्याचे राजकीय डबके करणारे आजचे राजकारणी पोर्तुगीज सत्तेचेच वारसदार”

पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांकडून जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश!

IPLच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच वेळी दोन सामने, बीसीसीआयचा मोठा निर्णय!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More