बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कौतुकास्पद! कोरोनामुळं अनाथ झालेल्या मुलांची शैक्षणिक जबाबदारी घेण्याचा जगताप दाम्पत्याचा निर्णय

सांगवी | कोरोनानं देशभरात हैदास घातला आहे. कोरोनामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. कोरोनानं अनेक हसती खेळती कुटुंब उध्वस्त केली आहेत. अनेकांना अनाथ बनवलं आहे. याच पार्श्वभूमीवर आई वडिलांचं छत्र हरवलेल्या मुलांची शैक्षणिक जबाबदारी घेण्याचा निर्णय बारामती तालुक्यातील पणदरेच्या जगताप दाम्पत्याने घेतला आहे.

बारामती तालुक्यातील पणदरेच्या दाम्पत्यातील विनोद जगताप आणि स्वरांजली जगताप असं नाव आहे. पुणे जिल्हा संभाजी ब्रिगेडचे सचिव विनोद जगताप व जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्रजी माध्यमच्या मुख्याध्यापक स्वरांजली जगताप यांनी ज्या मुलांचे पालक कोरोना महामारीमुळे मृत्यू झाले आहेत अशा मुलांचे शैक्षणिक पालकत्वाची जबाबदारी स्वीकारली आहे.

या मुुलांना बारामती तालुक्यातील जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्रजी माध्यम भिकोबानगर येथे दहावीपर्यंत गणवेश,दप्तर,वह्या पुस्तके देऊन मोफत शिक्षण देण्याचा सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

दरम्यान, आई-वडील किंवा त्यापैकी एकाला गमावलेल्या मुलांना वयाच्या 18 व्या वर्षी मासिक सहायता राशी आणि वयाच्या 23 व्या वर्षी पीएम केअर्समधून 10 लाख रुपये देण्यात येणार असल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

आनंदाची बातमी! गेल्या 24 तासात पुण्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

खासदार नुसरत जहाॅं यांचा गरोदरपणातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल

CO-WIN पोर्टलवर नोंदणी करताय,’…तर तुम्हाला पोर्टलवर ब्लॉक केलं जाईल’

“वाघ हा वाघ असतो मग तो पिंजऱ्यातला असो की जंगलातला, महाराष्ट्रावर वाघाचं राज्य”

अखेर कोरोना लसीचा पहिला डोस घेतला- अमृता फडणवीस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More