बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तरुणाकडून माणुसकीचं दर्शन! अशा प्रकारे वाचवले पक्षाचे प्राण, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हायरल होत असतं. व्हायरल होणारे काही फोटो आणि व्हिडीओ नेटकऱ्यांच्या मनाला स्पर्श करुन जात असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये पक्षी एका स्विमिंग पूलाच्या बाजूला शेवटच्या घटका मोजत पडला होता. त्याला श्वास घेण्यात अडचणी येत होत्या. एका तरुणानं या पक्षाची मदत केली आहे. तरुण पक्ष्याच्या छातीला चोळतो आहे. तो जसाजसा पक्ष्याच्या छातीला चोळतो आहे तसातसा हा पक्षी ओरडतो आहे.

तरुणानं आपल्या तोंडावाटे पक्षाला श्वास देण्याचा प्रयत्नही केला आहे. मात्र, एवढं सारं करुनही या पक्ष्याला काही फरक पडत नाहीये. हा पक्षी अजूनही उडू शकत नसल्याचे दिसतेय. त्यानंतर शेवटचा पर्याय म्हणून या माणसाने एअर कंप्रेसरद्वारे पक्ष्याच्या तोंडात हवा फुंकण्याचा प्रयत्न केला. मात्र, माणासाचा हा प्रयोग यशस्वी झाला. एअर कंप्रेसरमुळे हा पक्षी श्वास घ्यायला लागल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

दरम्यान, हा पक्षी पूर्णपणे बरा झाल्यानंतर, या पक्षात आणि संबंधित व्यक्तीमध्ये मैत्री झाली आहे. या माणसानं या पक्ष्याचं नाव जॉर्ज असं ठेवलं आहे. या व्हिडीओतील तरुणानं पक्षाचे प्राण वाचवल्यानं अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे.

पाहा व्हिडीओ – 

 

थोडक्यात बातम्या – 

“आता ठाकरे सरकार मुंबईतील पावसाची जबाबदारीही मोदींवरच ढकलेल”

मोठी बातमी! मुंबईसह राज्यातील या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

‘हे लग्न पूर्णपणे बेकायदेशीर होतं’; नुसरत जहांचे पतीवर गंभीर आरोप

रेल्वे रूळ की नदी?, पहिल्या पावसात मुंबईची झाली तुंबई, पाहा व्हिडीओ

आश्चर्यकारक! ‘या’ महिलेने एकाचवेळी दिला 10 मुलांना जन्म

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More