बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कौतुकास्पद! ‘या’ अभिनेत्यानं दत्तक घेतलेल्या गावात राबवली लसीकरण मोहिम

मुंबई | राज्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. यामुळे नियमांचं पालन न करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई केली जात आहे. कोरोनाकाळात अनेक लोक मदतीचा हात पुढे करत आहेत. अशातच दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूनं देखील या संकट काळात मदतीचा हात पुढे केला आहे.

2015 साली महेश बाबूनं आंध्रप्रदेशमधील बुरिपालेम हे गाव दत्तक घेतलेलं आहे. या दत्तक घेतलेल्या गावात महेश बाबूनं लसीकरण मोहिम राबवली होती. सात दिवसांत ही लसीकरण मोहिम यशस्विरित्या पार पडली आहे. त्याची पत्नी आणि निर्माती नम्रता शिरोडकर हिने नुकतीच ही माहिती दिली.

अभिनेत्री नम्रता शिरोडकरने आंध्र हॉस्पिटलच्या सहयोगाने आयोजित करण्यात आलेल्या लसीकरण शिबिराचे फोट इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटो शेअर करून तिने लिहिले की, बुरिपालेममध्ये सात दिवसीय लसीकरण मोहीम यशस्वीरित्या पूर्ण झाली. स्वतःच्या गावात लसीकरण केल्यामुळे आणखी आनंदाची वार्ता काय असू शकते. तुमच्या पाठिंब्यासाठी आभारी आहे महेश बाबू. आमच्या सर्व ग्रामीणांचे खूप खूप आभारी आहोत जे लस घेण्यासाठी पुढे आले.

दरम्यान, मागील महिन्यात अभिनेता महेश बाबूने घोषणा केली होती की, त्याचे वडील आणि अभिनेते, निर्माते कृष्णा यांचे जन्मस्थान बुरिपालेममधील लोकांचे लसीकरण करणार आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahesh Babu (@urstrulymahesh)

थोडक्यात बातम्या –

“शिवसेना विश्वास असणारा पक्ष, बाळासाहेबांनीही इंदिरा गांधींना दिलेला शब्दही पाळला होता”

15 लाखापेक्षा जास्त पाहिले गेले ‘या’ तरूणीचे तांडव नृत्य; पाहा अंगावर रोमांच आणणारा व्हिडीओ

“चंद्रकांत पाटील आपल्या मतावर ठाम नसतात, त्यांची मतं रोज बदलतात”

अजब प्रकार! कोरोना लस घेतल्यानंतर नागरिकाच्या अंगाला चिकटू लागल्या वस्तू अन्…..

ऑनड्यूटी रोमँटिक व्हिडीओ बनवणं पोलीस जोडप्याला पडलं महागात, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More