Top News महाराष्ट्र मुंबई

अकरावी, आयटीआय आणि इतर प्रवेश प्रक्रियांचा मार्ग आता झाला मोकळा!

मुंबई | मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळं अकरावी, आयटीआय आणि इतर प्रवेश प्रक्रियांचा मार्ग रखडला होता. मात्र तो आता मोकळा झाला असून या प्रवेश प्रक्रिया मराठा आरक्षणाशिवाय पार पडल्या जाव्या, अशा सूचना प्रशासकीय विभागांना देण्यात आल्या आहेत.

राज्यात सर्वाेच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने सुरू असलेल्या शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया अद्याप पूर्ण होऊ शकल्या नाहीत. अर्धे शैक्षणिक वर्ष संपत आले तरी याबाबतचा निर्णय सरकार घेत नव्हतं. यातच मंगळवारी उच्च न्यायालयातही याबाबतच्या याचिकेवर सुनावणी झाली. त्यावेळी उच्च न्यायालयानं सरकारला बुधवारी आपली भूमिका मांडण्याचे आदेश दिले होते.

राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेला हा निर्णय राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात अंतरिम स्थगिती उठविण्यासाठी दाखल केलेल्या विशेष अनुज्ञा याचिकेच्या निर्णयाच्या अधीन असेल, असं यात स्पष्ट करण्यात आलं आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी 9 सप्टेंबरपूर्वी मराठा आरक्षण वर्गातून म्हणजेच सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गातून प्रवेशासाठी अर्ज केले मात्र त्यांचे प्रवेश झाले नाहीत अशा विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच हा निर्णय अंतरिम स्थगिती उठवण्याच्या अर्जाच्या शेवटच्या निकालापर्यंत लागू असेल. या निर्णयाच्या तत्काळ अंमलबजावणीच्या दृष्टीने शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अपघात; पत्नीचा जागीच मृत्यू

“नारायण राणेंना त्यांच्या मुलांपासूनच खरा धोका आहे”

“आमदारकीसाठी बारामतीला जाऊन आमरस अन् गोड चहा घेणं सोडा”

देशांतर्गत वापरासाठी पुण्याहून सिरमच्या कोरोना वॅक्सिनची पहिली बॅच रवाना

नितेश राणे हे पहिले हँग ते चाराण्यासारख्या गोष्टी करतात- अब्दुल सत्तार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या